27 July 2024 10:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला
x

गुजरात सोहराबुद्दीन चकमक: अमित शहा सुद्धा कटात होते, पण कागदोपत्री पुरावे?

अहमदाबाद : कथित गुंड सोहराबुद्दीन शेख आणि त्याचा साथीदार तुलसीराम प्रजापती यांच्या कथित बनावट चकमकीचा कट रचणाऱ्यांमध्ये मुख्यत्वे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान अध्यक्ष व गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शहा, डी.जी. वंजारा, राजकुमार पांडियन व एम. एन. दिनेश हे ३ IPS अधिकारी सामील होते. परंतु, हे आरोप सिद्ध करणारे कोणता सुद्धा कागदोपत्री पुरावे नव्हते’, असे CBIचे मुख्य तपास अधिकारी संदीप तामगडे यांनी बुधवारी विशेष CBI न्यायाधीश एस. जे. शर्मा यांच्याकडे नोंदवलेल्या साक्षीत नमूद केले आहे.

तसेच, सरकारी पक्षाच्या सर्व साक्षीदारांची तपासणी सुद्धा पूर्ण झाल्याचे गुरुवारी सीबीआयतर्फे कोर्टात स्पष्ट करण्यात आले आहे. आता येत्या सोमवारपासून कोर्टाकडून सर्व आरोपींचे जबाब नोंदवले जाणार असल्याचे वृत्त आहे. प्रजापतीला केवळ राजकीय आणि गुन्हेगारीच्या हितसंबंधातून शिस्तबद्ध ठार करण्यात आल्याचे कॉल डेटा रेकॉर्डच्या पुराव्यातून उघड झालं होतं. विशेष म्हणजे अहमदाबादमधील एका मोठ्या बिल्डरच्या कार्यालयावर गोळीबार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोहराबुद्दीन तसेच प्रजापतीचा व्यवस्थित वापर करून घेतल्याचे दाखविणारेही पुरावे उपलब्ध होते’, असे मुख्य तपास अधिकारी संदीप तामगडे यांनी विशेष CBI कोर्टातील उलटतपासणीत विचारलेल्या थेट प्रश्नांच्या उत्तरांत स्पष्टपणे सांगितले.

सदर विवादित आणि हायप्रोफाईल प्रकरणातून भारतीय जनता पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आणि गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच ३ IPS अधिकारी वंजारा, पांडियन आणि दिनेश यांना CBI कोर्टाने याआधीच आरोपमुक्त केलेले आहे. विशेष म्हणजे CBIतर्फे या खटल्यात नोंदवण्यात आलेल्या तब्बल २१० साक्षीदारांपैकी जवळपास ६० टक्के साक्षीदार आधीच फितूर झालेले आहेत असे वृत्त आहे.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x