नवी दिल्ली : शरद पवारांचे जुने विश्वासू आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे तारिक अन्वर अखेर यांनी आज राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुन्हा काँग्रेसवापसी केली आहे. त्यामुळे बिहारमधील राष्ट्रवादीची ताकद संपुष्टात आली आहे. तारिक अन्वर हे दिल्लीतील राजकारणातले मोठे नेते आणि शरद पवारांचे विश्वासू म्हणून सर्वश्रुत होते. त्यामुळे काँग्रीसला बिहारच्या राजकारणात बळ मिळणार आहे.

तारिक अन्वर हे एनसीपी पक्षाच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावणारे नेते होते. काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती त्यात तारिक अन्वर यांची महत्वाची भूमिका होती. मागील काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवर काहीसे नाराज होत आणि परिणामी त्यांनी राजीनामा दिला होता. त्याला मूळ कारण राफेल डील प्रकरणात शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांची बाजू घेतली होती आणि ते पवारांच्या त्या भूमिकेवर प्रचंड नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता.

एका खासगी वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी राफेल खरेदी संदर्भातील प्रश्न विचारण्यात आला होता. त्यात पवारांनी मोदींना एकप्रकारे अप्रत्यक्ष क्लीन चिट दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावेळी त्यांनी पक्ष आणि खासदारकीचा राजीनामा देत आहे असं म्हटलं होत. आज अखेर त्यांनी घरवापसी करत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

former ncp leader tariq anwar joined congress in the presence of party president rahul gandhi