17 May 2024 2:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक 'हाय रिस्क' वर, तज्ज्ञांचा Sell करण्याचा सल्ला, किती घसरणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, संधी सोडू नका Rajnish Retail Share Price | अवघ्या 63 पैशाचा शेअर! 4 वर्षात दिला 14000% परतावा, स्टॉक आजही स्वस्त आणि फायद्याचा Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक ब्रेकआऊट लेव्हल अपडेट, शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा सल्ला काय? IREDA Share Price | तज्ज्ञांचा IREDA शेअर्स 'Hold' चा सल्ला, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस जाहीर HDFC Mutual Fund | अबब! जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 9.57 कोटी रुपये परतावा दिला Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

हिंदी भाषिक राज्यांनी मंदिरांचं धार्मिक राजकारण झिडकारलं, शिवसेना बोध घेईल? सविस्तर

जयपूर : सध्या ५ राज्यांमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून देशात मोदी जादू संपल्यात जमा आहे. त्याचा प्रत्यय तेलंगणात आणि छत्तीसगडमध्ये स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या हिंदी भाषिक राज्यांमध्ये धार्मिक राजकारण मोठ्या प्रमाणावर केलं गेलं असलं तरी ते मतदाराने स्पष्टपणे नाकारलं आहे हे निवडणुकीच्या निकालांवरून दिसत आहे.

आगामी निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचा मुद्दा जाणीवपूर्वक पेटवून १९९५-९६ मध्ये जसा फायदा झाला होता. त्याच उद्देशाने हा मुद्दा जाणीवपूर्वक तापवला गेला हे सर्वश्रुत आहे. त्यात भाजप सोबत एनडीए’मधील घटक पक्ष असलेली शिवसेना सुद्धा सारखीच सहभागी होती. सत्ताकाळात विकास कामांच्या बाबतीत कुचकामी ठरलेली शिवसेना २०१९ मध्ये मतदाराला काय सांगणार हा विषय समोर असल्याने जाणीवपूर्वक त्यांनी राम मंदिराच्या विषयाला हात घातला. परंतु, सध्या देशातील काही हिंदी भाषिक राज्यांमधील निकालाचे कल पाहता शिवसेनेने धडा घेणे गरजेचे आहे.

यानंतर सुद्धा भाजपवर दबाव आणण्यासाठी आणि बार्गेनिंग पावर वाढवण्यासाठी हे केले गेले असल्याचे मतदाराच्या पचनी न पडल्यास भाजपपेक्षा शिवसेनेवर मतदाराची वक्रदृष्टी पडेल असं राजकीय विश्लेषकांना प्रथम दर्शनी वाटत आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x