पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारसमोर पुन्हा एकदा राज्यातील सत्ता टिकवून ठेवण्याचं राजकीय संकट उभं राहिलं आहे. पर्रिकरांच्या जागेवर नवीन नेता निवडण्याचं आव्हान भाजसमोर निर्माण झालं आहे. कारण काँग्रेस पक्षानं राज्यपालांना पत्राद्वारे सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे.
दरम्यान गोव्यातील या घडामोड पाहता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रविवारी रात्री गोव्यात दाखल झाले असून भाजप नेत्यांसोबत त्यांच्या रात्रभर बैठका घेत आहेत. नितीन गडकरी आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे नेते सुदिन ढवळीकर यांची रात्रभर बैठक सुरू होती. ढवळीकर यांनी सांगितले की, आपल्या पक्षासोबत बैठक केल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असेल, याबाबतची माहिती सांगेन. दरम्यान, गोव्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार असून, त्यात गोवा फॉरवर्ड पक्ष, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि अपक्षांचा समावेश आहे.
पक्ष निहाय गोव्यातील संख्याबळ
एकूण जागा : ४०
सध्याचे संख्याबळ – ३६
भाजप : १२
मगोप – ३
गोवा फॉरवर्ड – ३
अपक्ष – ३
दुसरीकडे काँग्रेस आघाडी
काँग्रेस : १४
राष्ट्रवादी काँग्रेस- १
