20 September 2021 2:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
पंजाबच्या नवीन मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली | पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री तर दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी Crime Patrol | गुजरातमधील मुंद्रा बंदरातून तब्बल 9 हजार कोटींचे हेरॉइन जप्त Javed Akhtar Vs Kangana Ranaut | अटक वॉरंटच्या शक्यतेने कंगना रणौत अंधेरी कोर्टात हजर राज्यसभा निवडणुकीमार्फत भाजपाची मुंबई महापालिकेतील उत्तर भारतीय मतांसाठी मोर्चेबांधणी | संजय उपाध्याय यांना उमेदवारी Gold Price | सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण | हा आहे आजचा भाव Pitru Paksha 2021 | कोरोना काळात ज्यांचा अंत्यसंस्कार योग्यरित्या करता आला नाही | त्यांच्या शांतीसाठी 'या' विधी Kangana Ranaut Vs Javed Akhtar | कंगना आज न्यायालयात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता
x

भाजपा कार्यकर्त्यांकडून मला गँगरेपची धमकी: दिया शेटक

पणजी : गोवा प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सचिव दिया शेटकर यांनी भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नेते सुभाष शिरोडकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुभाष शिरोडकर यांच्या कार्यकर्त्यांनी मला थेट गँगरेपची धमकी दिल्याचा खळबळ जनक आरोप दिव्या शेटकर यांनी केल्याने गोव्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या संदर्भात दिव्या शेटकर यांनी पोलिसात रीतसर लेखी तक्रार दाखल केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

उपलब्ध माहितीनुसार, सुभाष शिरोडकर यांच्या कार्यकर्त्यांवर दिया शेटकर यांनी थेट आरोप केला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारी नुसार, दिव्या शेटकर यांनी ‘रविवारी सकाळी मला एक फोन कॉल आला. फोनवर बोलणारी व्यक्ती मी सुभाष शिरोडकर यांचा कार्यकर्ता असल्याचं सांगत फोनवरून घाणेरड्या शिवीगाळ करत होती. अत्यंत अर्वाच्य आणि उद्धट भाषेत माझ्याशी तो कार्यकर्ता बोलत होता. तसेच बोलताना त्याने आपल्याला जीवे मारण्याची आणि गँगरेपची धमकी दिल्याचे’ त्यांनी तक्रारीत सांगितले आहे. आणि शिरोडा क्षेत्रात तुम्ही जर शिरोडकरांविरोधात आवाज उठवाल तर याद राखा अशी थेट धमकी देत बजावल्याचे दिव्या शेटकर तक्रारीत म्हटल्या आहेत. त्यानुसार स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत.

हॅशटॅग्स

BJP(446)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x