अहमदाबाद : गुजरातमध्ये २०१५ साली झालेल्या पटेल आरक्षण आंदोलनावेळी मेहसाणा येथील हिंसाचार प्रकरणी पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याला आणि इतर दोघांना विसनगर जिल्हा न्यायालयाने दोषी ठरविले असून त्यांना २ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या निर्णयादरम्यान न्यायालयाने इतर १४ जणांना दोषमुक्त ठरवलं आहे. जुलै २०१५ मध्ये भाजप आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयात प्रचंड हिंसाचार उफाळून आला होता आणि त्यावेळी आक्रमक आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर जाळपोळ तसेच तोडफोड केली होती. त्यावेळी पटेल आरक्षण आंदोलनामुळे गुजरातमधील वातावरण खूप तापले होते तसेच राज्यसरकार विरोधात प्रचंड रोष उफाळून आला होता.
त्या मेहसाणा हिंसाचार प्रकरणी दोन वर्षांनी न्यायालयाचा निकाल आला आहे जो पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलच्या विरोधात गेल्याने गुजरातमधील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्ह आहेत.
गुजरात में आरक्षण और किसानों की क़र्ज़ा माफ़ी की माँग के साथ 25 अगस्त से अहमदाबाद में अनिच्छितकालिन अनशन ।।
हमारा विजय संकल्प है और सरकार को जनता के मौलिक अधिकारों के सामने झुकाएँगे !!! युवाओं को मिले अधिकार,
किसानों को मिले सम्मान ।। pic.twitter.com/SW52RRC3P8— Hardik Patel (@HardikPatel_) July 24, 2018
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		