28 June 2022 5:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RD Vs SIP | या 2 पर्यायांपैकी कशामध्ये दर महिन्याला रु. 2000 गुंतवणूक करणे अधिक योग्य आहे | फायद्याचं गणित जाणून घ्या Maharashtra Govt Recruitment | महाराष्ट्र पोलीस भरती संबंधित नवीन जीआर प्रसिद्ध | संपूर्ण GR वाचा शिवसेना पूर्णपणे संपविण्यासाठी दिल्लीत जोरदार बैठका | आता शिंदेंवर सेनेचे खासदार फोडण्यासाठी दबाव वाढवला? शिंदेसोबत बैठकीसाठी फडणवीस दिल्लीला | सोबत वकिल महेश जेठमलानी सुद्धा | शिंदे गट कायद्याच्या कचाट्यात एकनाथ शिंदे गट कायदा आणि घटनात्मक चौकटीत फसतोय | शिंदे भाजप नेत्यांसोबत बैठकीसाठी दिल्लीत Multibagger Stocks | 3 वर्षांत 190 टक्के रिटर्नसह 250 टक्के लाभांश | हा शेअर तुमच्याकडे आहे? नागपूर-बुटीबोरी मार्गावर 6 पदरी उड्डाणपूल | 15 मिनिटांत 19 किमीचं अंतर कापता येईल - नितीन गडकरी
x

संधी द्या, स्वच्छ आणि सुरक्षित औरंगाबाद शहर देतो : राज ठाकरे

Raj Thackeray, Aurangabad, Sambhajinagar

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले असता औरंगाबादमधील भेटीदरम्यान त्यांनी औरंगाबाद व्हिजन कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्तीशी संवाद साधला. दरम्यान, उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी विकासासोबत औरंगाबाद शहर आणि राजकारणातील वास्तव सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला.

उपस्थित संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, ‘तुम्ही राजकारणाचे बळी ठरला आहात, घाबरून मतदान करता. एकदा डोळे उघडून नीट बघा, कानावरचे हात बाजूला काढा. आधी तुम्ही बदला मग शहर बदलेल . मनसेला संधी द्या, मी स्वच्छ आणि सुरक्षित शहर देतो.” असं आवाहन राज ठाकरे यांनी औरंगाबादवासीयांना दिल.

औरंगाबाद व्हिजन कार्यक्रमात बोलताना त्यांनी राजकारणातील एक खंत व्यक्त केली की, ‘विकास कामांवर मतदान होतं याच्यावरचा माझा विश्वासच उडाला आहे. तुम्ही विकासाला मतदानच करत नाही. केवळ अडचणीच्या वेळीच तुम्हाला राज ठाकरे आठवतो असं सांगताना नाशिक महापालिकेत झाले तसे काम तुमच्या शहरात देखील होऊ शकतात ,”असा विश्वास त्यांनी औरंगाबादवासीयांना दिला.

औरंगाबाद शहरातील राजकारणावर बोट ठेवत त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले. त्यांनी म्हटलं की, औरंगाबाद शहरात राजकारणी तुम्हाला भीती दाखवतात, निवडणुकीच्या वेळी दंगली घडवल्या की तुम्ही पुन्हा त्यांनाच मतदान करता, मग कशाला हवा तुम्हाला विकास असा घणाघात राज ठाकरेंनी सत्ताधारी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षावर केला.

दरम्यान त्यांनी नुकताच औरंगाबाद शहरातील गाजलेला कचरा प्रश्‍न सुद्धा उपस्थित केला. गेल्या २५ वर्षात तुमचे शहर आणि खासदार यातील काहीच बदलले नाही आणि त्यामुळे नागरिक म्हणून त्यांना तुमची भीतीच उरलेली नाही. हेच कारण आहे की,’कचरा प्रश्‍न तसाच रेंगाळत पडला आहे’. नाशिक शहरात मनसेने काही नसतांना खूप चांगल्या गोष्टी केल्या. औरंगाबादकडे तर जगप्रसिद्ध अजिंठा, वेरुळ लेण्या आहेत.याचा अर्थ जगभरातील विमानं तुमच्या शहरात उतरायला हवीत. या लेण्यांची योग्य काळजी आणि मार्केटिंग केले तर महाराष्ट्राला हजारो कोटीच उत्पन्न मिळेल असं राज ठाकरे म्हणाले.

‘राजकारण आणि मतदान हसण्यावारी घेऊ नका असे आवाहन मनसे अध्यक्षांनी उपस्थितांना केले. छोट्या मोठ्या घटनांना घाबरू नका, एकदा मला संधी द्या, मग बघतो तुम्हाला कोण हात लावतो ते’, असा विश्वास व्यक्त करतानाच पुढच्या वेळी मी येईन तेव्हा औरंगाबाद शहराच्या विकासाचा आराखडा तुमच्या समोर ठेवीन असा शब्द त्यांनी उपस्थितांना दिला. पुढे सत्ताधाऱ्यांवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, सत्तेसाठी शिवसेना आणि एमआयएमचे साटेलोटे आहे. निवडणुकीपुरते ‘ते’ हैद्राबाद वरुन येतात, भीतीदायक वातावरण करतात, दोघांचाही लाभ करुन पाच वर्षासाठी निघून जातात.

 

Web Title:  I will provide clean and safe city says Raj Thackeray to Aurangabad citizens.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(714)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x