27 May 2022 5:44 AM
अँप डाउनलोड

न्या. लोया मृत्यू प्रकरण, भाजपची काँग्रेसवर टीका

नवी दिल्ली : सर्वोच न्यायालयाच्या निकालानंतर आता भाजप काँग्रेसमधील राजकारणाला सुरुवात झाली आहे. नुकतेच राज्यसभेवर गेलेले खासदार कुमार केतकर यांनी सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्न चिन्हं उपस्थित केलं आहे.

सर्वोच न्यायालयाच्या निकालानंतर भाजपने सुद्धा काँग्रेसवर पलटवार केला आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर थेट टीका केली, ते म्हणाले की ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शंका उपस्थित करणा-या याचिका दाखल करणा-यांच्या मागे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तसेच काँग्रेसचे अदृश्य हात होते’.

काँग्रेसच्या हातून सत्ता निसटत असल्याचे पाहूनच काँग्रेस हे हीन दर्जाचे राजकारण खेळत आहे अशी टीका भाजपने केली आहे. काँग्रेसने आमचे यशस्वी अध्यक्ष अमित शहा यांच्या विरुद्ध हे षडयंत्र रचलं आहे. केवळ राजकीय हेतूने ही याचिका प्रेरित होती असा थेट आरोप भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.

काँग्रेसमुळेच न्याय व्यवस्था रस्त्यावर आली आणि त्यामुळेच राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी असं ही भाजप प्रवक्ते म्हणाले. एकूणच सर्वोच न्यायालयाच्या निकालानंतर आता दिल्लीतील राजकारण तापलेलं दिसत आहे.

हॅशटॅग्स

#Amit Shah(261)#Narendra Modi(1659)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x