24 September 2020 10:22 PM
अँप डाउनलोड

राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन

मुंबई : भाजपचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. के जे सोमय्या रुग्णालयात पहाटे 4.32 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पांडुरंग फुंडकर पहाटे ४ वाजता उठले. नंतर त्यांना उलटी होताच त्यांनी सुरक्षारक्षकांना उठवलं. परंतु त्यांच्या घरी कोणीही नसल्याने सुरक्षारक्षकांनी त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेलं. रुग्णालयात घेईन जाताना प्रवासा दरम्यानच वाटेत त्यांना हार्टअटॅक आल्याचं सांगण्यात येत आहे.

अखेर आज के जे सोमय्या रुग्णालयात पहाटे ४.३२ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली निधनाने भाजपसह सर्वांनाच धक्का बसला आहे. भाजपमधील ते एक जेष्ठ नेते म्हणून परिचित होते.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

BJP(421)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x