BMC निवडणूक | शिवसेनेकडून 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा' मोहीम
मुंबई, ५ जेनेवारी: एकाबाजूला काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी सोमवारी पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यावेळी आगामी निवडणुकीत मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा तिंरगा झेंडा फडकावण्याचा निर्धार भाई जगताप यांच्यासह काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी बोलून दाखवला होता. मुंबईत स्वबळावर लढण्याची इच्छा सर्व कार्यकर्त्यांची असून, विरोधकांसाठी जिथे आवश्यक आहे, तिथे एक घाव दोन तुकडे करून जोरदार झटका दिला जाईल. भारतीय जनता पक्षाने मुंबई महापालिकेतील ८२ जागा वाचवून दाखवाव्यात, असे आव्हान यावेळी आमदार भाई जगताप यांनी दिले होते.
दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली नसली तरी राष्ट्रवादीशी आघाडीची शक्यता वर्तविण्यात येतं आहे. त्यात मुंबई महानगरपालिका शिवसेनेसाठी राजकीय दृष्ट्या अत्यंत उच्च स्थानी असल्याने मुंबईची सत्ता स्वतःकडे ठेवण्यासाठी सर्वोच्च प्रयत्न करेल यात शंका नाही. त्यासाठी मराठी मतदारांपासून अमराठी मतदार देखील शिवसेनचं लक्ष आहेत. मराठी मतदार भाजपाकडे वर्ग होण्याची शक्यता कमी असून अमराठी मतदारांवरच त्याची राजकीय मदार असेल. शिवसेनासोबत नसल्याने भाजपाला मोठा राजकीय फटका बसणार यात शंका नाही. मात्र भाजपाची वोट बँक तोडण्यासाठी देखील शिवसेना तयारीला लागली आहे.
शिवसेनेने यासाठी अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असं म्हणत शिवसेनेने गुजराती मतदारांना साद घातली आहे. एका बाजूला भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.
दरम्यान शिवसेना देखील अमराठी मतांसाठी जोरदारपणे तयारीला लागली आहे. याचाच भाग म्हणून शिवसेनेकडून ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ मोहीम सुरु करण्यात आली आहे. शिवसेनेकडून गुजरातींसाठी मेळावा आयोजित करण्यात आला असून त्याला ही अशी टॅगलाईन वापरण्यात आली आहे. शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. डिसेंबर २०१६ मध्ये हेमराज शहा यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते श्री. हेमराज शहा, श्री. जयंती मोदी तसेच भाजपचे गुजराती विभागाचे उपाध्यक्ष श्री….
Posted by ShivSena on Thursday, December 15, 2016
तयारीचा भाग म्हणजे १० जानेवारीला जोगेश्वरीत गुजराती समाजाचा मेळावा पार पडणार आहे. यासाठी मराठी आणि गुजराती भाषेत निमंत्रणं छापण्यात आली आहेत. या मेळाव्यात शिवसेनेत जाहीर प्रवेशदेखील पार पडतील असं सांगितलं जात आहे.
News English Summary: Shiv Sena is also preparing for Amrathi votes. As a part of this, Shiv Sena has started ‘Mumbai Ma Jalebi Na Fafda, Uddhav Thackeray Apada’ campaign. Shiv Sena has organised a rally for Gujaratis and it has used such a tagline. Shiv Sena organizer Hemraj Shah has been given the responsibility of Gujarati voters. Hemraj Shah had publicly joined the Shiv Sena in December 2016.
News English Title: Shivsena Mumbai Municipal Corporation Gujarati Vote bank responsibility on Hemrajbhai Shah news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट