14 May 2021 4:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
गुजरातमध्ये कोरोना मृतांच्या आकड्यांची खोटी माहिती? 1.23 लाख मृत्यूचे दाखले वितरित अन कोरोनाने मृत्यूचा आकडा 4218 दिल्लीकरांसाठी देवदूत ठरलेल्या बी श्रीनिवास यांच्याविरोधात क्राईम ब्रांच फेरा | मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा संताप 91.6 टक्के परिणामकारक रशियन स्पुतनिक लसीची भारतातील प्रति डोस किंमत 995 रुपये तुमच्या तिथे चहात बिस्किटं बुडत असतील, आमच्याकडे चहातंच पूर्ण देश बुडाला - काँग्रेस प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत, पंतप्रधान, गृहमंत्री गायब - संजय राऊत कोरोना आपत्ती | जाहीर आकडेवारी पेक्षा भारत आणि मेक्सिकोमध्ये दुप्पट मृत्यू - अमेरिकन इंस्टीट्यूटचं विश्लेषण राज्य सरकारचं शिष्टमंडळाने राज्यपालांना भेटलं, पंतप्रधानांची वेळ मागणार असल्याचे जाहीर होताच....
x

अच्छे दिनची स्वप्नं; नंतर हिंदुस्तानच्या सामान्य माणसाच्या कापडापासूनच सूत तयार करणारे मोदी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महात्मा गांधीजींच्या जयंतीचे अभिवादन करून व्यंगचित्रातून “अच्छे दिनच्या स्वप्नांचं” उपहासात्मक वास्तव मांडलं आहे. या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी कापडापासून सूत तयार करणारे महात्मा गांधींजी दर्शवले आहेत. परंतु त्यात महात्मा गांधीजींच्या वेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी चरखा चालवताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या बाजूला अमित शहा असणं जरुरीचं असल्याने ते सुद्धा या व्यंगचित्रात दिसत आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राज ठाकरे संधी मिळताच व्यंगचित्रातून उपहासात्मक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर प्रहार करतच असतात. अच्छे दिनची स्वप्नं दाखविणारे मोदी हिंदुस्तानच्या सामान्य माणसाच्या कपड्यापासून सूत तयार करत आहेत असं दाखविण्यात आलं. तर देशाची अर्थव्यवस्था आणि विचारवादाचा उडालेला गोंधळ कचऱ्याच्या ढिगासारखा गुंडाळल्याचे राज यांनी व्यंगचित्रातून सूचवले आहे. राज ठाकरेंचे हे मार्मिक हल्ले समाज माध्यमांवर मराठी आणि इंग्लिश भाषेत प्रसिद्ध होत असल्याने त्याचा जास्त प्रभाव होताना दिसत आहे.

काय आहे ते व्यंगचित्र?

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1538)#Raj Thackeary(664)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x