11 December 2024 2:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम
x

मुंबईत ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण; चेन्नईत २ पत्रकारांची टेस्ट पॉझिटिव्ह

Covid 19, Corona Crisis, Journalist test positive

मुंबई, २० एप्रिल: सोमवारी सकाळपर्यंत भारतातील करोनाबाधितांचा आकडा १७,२६५ पर्यंत पोहचलाय तर ५४३ जणांना आपला जीव गमवावा लागलाय. मात्र, दिलासादायक म्हणजे सध्याच्या घडीला देशातील तब्बल ३३९ जिल्हे करोनामुक्त आहेत. त्यामुळे, या भागांना लॉकडाऊनमधून थोडी सूट (सशर्त) मिळण्याची चिन्हं आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण ७४७ जिल्ह्यांपैंकी तब्बल ४०८ जिल्ह्यांतून करोना संक्रमणाची प्रकरणं समोर आली आहेत. मात्र सध्या ३३९ जिल्ह्यांमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही.

मात्र आता पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, सामान्य लोकं तसेच राजकीय व्यक्तींच्या संपर्कात असणारे पत्रकार देखील कोरोनाच्या सापळ्यात अडकल्याचे वृत्त आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांनी दिलेल्या माहितीनुसार १६८ पत्रकारांची करोनाची चाचणी घेण्यात आली. त्यापैकी ५३ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे यांनी आयएएनएसला दिलेल्या माहितीनुसार, ३० पेक्षा जास्त पत्रकारांना करोनाचा संसर्ग झाला आहे.

टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन आणि मंत्रालयातील पत्रकार संघाच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकांराच्या करोना चाचणीसाठी महापालिकेला विशेष कॅम्प आयोजित करण्यास सांगितले होते. करोनाचा संसर्ग झालेल्यांमध्ये बर्‍याच जणांना करोनाची कोणतीही लक्षणेही नव्हती. अद्याप काही पत्रकारांच्या चाचणीचा अवहवाल येणं बाकी आहे. त्यामुळे ही संख्या आणखी वाढू शकते असंही म्हटलं जातंय.

विशेष म्हणजे चेन्नईतील दोन पत्रकारांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सरकारला देखील धक्का बसला आहे. कारण त्याच पत्रकारांच्या संपर्कात अनेकजण आल्याची शंका असून त्यानुसार पुढील शोध सुरु असल्याचं सरकारने म्हटलं आहे. याबद्दल अधिकृत वृत्त पीटीआयने दिले आहे.

 

News English Summary: Chief Minister Uddhav Thackeray had asked the municipality to organize a special camp for the Corona test of the leaflet following the request of the TV Journalist Association and a journalist team from the ministry. Among those infected with coronas, many had no symptoms of coronas. There are still some journalists to test. It is also said that this number may increase further.

News English Title: Story 2 journalists test positive for Corona Virus in Chennai Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x