28 June 2022 6:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO Investment | व्हिस्की मेकर कंपनी ऑफिसर्स चॉइस IPO लाँच करणार | गुंतवणुकीची संधी Mutual Fund Investment | या आहेत पैसे दुप्पट-तिप्पट करणाऱ्या म्युच्युअल फंड योजना | फंडस् लक्षात ठेवा Home Loan Top-Up | कर्जाच्या ईएमआयने घराशी संबंधित खर्च भागत नाही? | टॉप-अपचा पर्याय निवडा RD Vs SIP | या 2 पर्यायांपैकी कशामध्ये दर महिन्याला रु. 2000 गुंतवणूक करणे अधिक योग्य आहे | फायद्याचं गणित जाणून घ्या Maharashtra Govt Recruitment | महाराष्ट्र पोलीस भरती संबंधित नवीन जीआर प्रसिद्ध | संपूर्ण GR वाचा शिवसेना पूर्णपणे संपविण्यासाठी दिल्लीत जोरदार बैठका | आता शिंदेंवर सेनेचे खासदार फोडण्यासाठी दबाव वाढवला? शिंदेसोबत बैठकीसाठी फडणवीस दिल्लीला | सोबत वकिल महेश जेठमलानी सुद्धा | शिंदे गट कायद्याच्या कचाट्यात
x

‘डी’कोल्ड व सॅरिडॉनसह ३४३ औषधांवर लवकरच बंदी?

नवी दिल्ली – ‘डी’कोल्ड आणि सॅरिडॉनसह ३४३ औषधांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून लवकरच बंदी येण्याची शक्यता आहे. सर्वाधिक वेदनाशामक तसेच फ्लू’शी संबंधित औषधांवर बंदी येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. कारण ही औषधे ‘फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ औषधे आहेत असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. या औषधांवर बंदी घातली जावी म्हणून एका केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका उपसमितीने शिफारस केली होती. ही शिफारस मान्य करून या औषधांवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.

कोणत्याही आजारावर उपचार म्हणून वापरण्यात येणारी औषधे जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रकार एकत्र करून तयार केली जातात. त्यामुळे ते औषध घेण्याची मात्रा ठरलेली असते. त्यामुळेच अशा औषधांना फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन असे म्हटले जाते. केंद्र सरकारनं या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास फेंसेडिल, सॅरिडॉन, डी कोल्ड टोटलसारखे कफ सिरप आणि पेन किलरवर बंदी येईल असं वाटत आहे.

सरकारने या औषधांवर बंदी घातल्यास त्याचा एबॉटसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसह पिरामल, मॅक्लिऑड्स, सिप्ला आणि ल्युपिनसारख्या राष्ट्रीय कंपन्यांच्या व्यवसायाला फटका बसणार आहे. सरकारने बंदीचा निर्णय जाहीर केल्यास त्याविरोधात या कंपन्या न्यायालयात धाव घेऊ शकतात.

हॅशटॅग्स

BJP(446)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x