23 November 2019 8:09 AM
अँप डाउनलोड

मुंबईत मुख्यमंत्र्यांशी चर्चेला जाणाऱ्या प्रतिनिधींचा लातूरमध्ये मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत निषेध

लातूर : आज मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर मराठा समाजाचे काही समन्वयक आणि राज्य सरकार यांच्यात चर्चा झाली. परंतु त्या विरुद्ध आज लातूर मध्ये पार पडलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत मुंबईमधील बैठकीचा तीव्र निषेध करण्यात आला आणि मुंबईतील ती चर्चा आम्हाला मान्य नाही अस सांगण्यात आलं. तसेच यापुढे सरकारशी कोणतीही चर्चा न करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

राज्य सरकारने आता ठोस निर्णय घेवूनच चर्चेला समोर यावे अन्यथा यापुढे कोणतीही चर्चा केली जाणार नाही असं थेट आवाहन सरकारला करण्यात आलं आहे. लातूरमध्ये आज राहिचंद्र मंगल कार्यालयात सकाळी मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीला सुरवात झाली तेव्हा जिल्ह्यातील सर्व समन्वयक आपली बाजू मांडत होते. त्यावेळी मुंबईतील बैठकी विषयी चर्चा झाली तेव्हा, अशा चर्चेच्या माध्यमातून राज्य सरकार हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करीत आहे असा सरकारवर थेट आरोप आंदोलकांनी केला.

आता मुख्यमंत्र्यांनी चर्चेत वेळ न घालवता ठोस निर्णय घेवूनच आमच्या समोर चर्चेला यावे अशी ठाम भूमिका घेण्यात आली. सरकार केवळ मुंबईत चर्चा घडवून आंदोलकांमध्ये जाणीवपूर्वक संभ्रमाचं वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप सुद्धा आंदोलकांनी राज्य सरकारवर केला आहे. त्यामुळे आंदोलकांमध्ये फूट पडल्याचा संदेश जाऊन आंदोलनाची धार कमी करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं आंदोलकांच म्हणणं आहे. त्यामुळे लातूरमधील घडामोडीनंतर सरकार नक्की काय करत ते पाहावं लागणार आहे.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(38)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या