मुंबई : सध्या देशात महागाईपासून अनेक ज्वलंत विषय पेटले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ स्वतःची प्रसिद्धी करण्यातच व्यस्त असल्याचा धागा पकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याच प्र’सिद्धिविनायका’च व्यंगचित्र रेखाटलं आहे. देशात अनेक महापुरुष असताना काही दिवसांपूर्वी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये नरेंद्र मोदींवरील चित्रित करण्यात आलेला लघुपट दाखविण्याचे डिजिटल फर्मान सुद्धा सोडण्यात आले होते, त्या मुद्याला सुद्धा राज ठाकरे यांनी हात घातला आहे.
राज ठाकरे यांनी मोदीरूपी प्र’सिद्धिविनायका’च व्यंगचित्र रेखाटताना ठराविक प्रसार माध्यम, ईव्हीएम आणि प्रचंड पक्षनिधी यावर सुद्धा मार्मिक बोट ठेवलं आहे. जनता अनेक मुद्यांवरून होरपळत असताना नरेंद्र मोदी म्हणजे प्र’सिद्धिविनायक’ केवळ प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या प्रसिद्धीतच रममाण झाल्याचे चित्र देशभर पाहायला मिळत आहे. नेमकं याच मुद्यांवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून मार्मिक भाष्य केलं आहे. समाज माध्यमांवर या व्यंगचित्राला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
काय आहे ते प्र’सिद्धिविनायका’च नेमकं व्यंगचित्र?
