मुंबई : शहरात विविध अडचणींचा सामना करणाऱ्या दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवास्थानी भेट घेतली आहे. या गणेशोत्सव मंडळांनी त्यांना भेडसावत असणाऱ्या सर्व समस्या राज ठाकरे यांच्याकडे मांडल्या आहेत.
गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनीशी झालेल्या बैठकीनंतर स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या गिरगावातील गणपती मंडळांना भेट देणार असल्याचे समजते. मुंबई महापालिकेच्या जाचक अटी आणि नियमांमुळे गणपतीच्या मूर्ती तयार करण्याचे कारखाने बनवण्यामध्ये प्रचंड अडचणी भेडसावत असल्याचा आरोप या मूर्ती बनवणाऱ्या कलाकारांकडून करण्यात आला आहे.
तसेच गणेशोत्सवासंदर्भात लावेलेल अनेक निर्बंध, लाऊडस्पीकरला असलेला विरोध आणि राज्य सरकार तसंच महापालिका यांची गणेशोत्सवासंदर्भात असलेल्या भूमिकेविरोधात अखिल खेतवाडी गणेशोत्सव मंडळांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि विविध समस्या व जाचक अटींची त्यांना माहिती दिली.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		