26 April 2024 6:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

OBC Reservation | चालू पोटनिवडणुकांत ओबीसी आरक्षण नाही | पण नंतरच्या निवडणुकांत आरक्षण मिळेल - निवडणूक आयोग

OBC Reservation

मुंबई, २५ सप्टेंबर | स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) २७ टक्के आरक्षण देण्यासाठी ‘महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम १९६१’ मध्ये सुधारणा करण्याकरिता राज्य मंत्रिमंडळाने पाठवलेल्या अध्यादेशावर (आॅर्डिनन्स) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवार (ता. २३) सही केली. मात्र ६ जिल्ह्यांतील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांतर्गत सध्या प्रक्रिया राबवण्यात येत असलेल्या पोटनिवडणुकांना तो लागू असणार नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. धुळे, नंदुरबार, नागपूर, पालघर, अकोला आणि वाशीम या सहा जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांचे ८५ निवडणूक विभाग आणि १४४ निर्वाचन गणांमध्ये ५ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. येथील निवडणुकांतील उमेदवारांच्या अर्जांची छाननी पूर्ण झाली असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची २९ सप्टेंबर मुदत आहे.

OBC Reservation, चालू पोटनिवडणुकांत ओबीसी आरक्षण नाही | पण नंतरच्या निवडणुकांत आरक्षण मिळेल – OBC reservation in the current local body elections but it will applicable in nest elections said election commission :

राज्यपाल महोदयांनी आदेश प्रख्यापित ज्या दिवशी केला तेव्हापासून कायदा अस्तित्वात येतो. कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू होत नाही. म्हणून ६ जिल्ह्यांतील परिषदा व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम अध्यादेश प्रख्यापित करण्यापूर्वी जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे या निवडणुका प्रभावित होणार नाहीत, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. महापालिकांमध्ये याच पद्धतीने ओबीसींना आरक्षण देण्यात येणार आहे, मात्र नगरविकास विभागाने पाठवलेल्या सुधारणा अधिनियमाच्या अध्यादेशावर अद्याप राज्यपालांची सही झालेली नाही. ती झाल्यावर महापालिकांमध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण देणारा, पण ५० टक्केच्या आत एकूण आरक्षण ठेवण्याचा सुधारणा अधिनियम प्रख्यापित होईल.

अध्यादेशातील सुधारणा काय?
जिल्हा परिषद:
मागासवर्गाच्या प्रवर्गातील (ओबीसी) व्यक्तींना २७ टक्के जागा राखून ठेवण्यात येतील. मात्र ते आरक्षण जिल्हा परिषदांमधील एकूण जागांच्या ५० टक्के पुढे जाणार नाही. अनुसूचित क्षेत्रांचा समावेश असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये अनुसूचित जाती व जमाती यांच्यासाठी राखून ठेवल्यानंतर उर्वरित जागा मागासवर्गाच्या प्रवर्गाला देण्यात येतील. तसेच राखून ठेवायच्या पदांच्या १/२ पदे मागासवर्गाच्या प्रवर्गातील महिलांसाठी राखून ठेवण्यात येतील. मागासवर्गाच्या प्रवर्गातील व्यक्तींसाठी २७ टक्के अध्यक्षांची पदे राखून ठेवण्यात येतील.

पंचायत समिती:
मागासवर्गाच्या प्रवर्गातील (ओबीसी) व्यक्तींना २७ टक्के जागा राखून ठेवण्यात येतील. मात्र ते आरक्षण पंचायत समितीमधील एकूण जागांच्या ५० टक्के पुढे जाणार नाही. अनुसूचित क्षेत्रांचा समावेश असलेल्या पंचायत समित्यांमध्ये अनुसूचित जाती व जमाती यांच्या जागा राखून ठेवल्यानंतर उर्वरित जागा मागासवर्गाच्या प्रवर्गाला देण्यात येतील. तसेच राखून ठेवायच्या पदांच्या १/२ पदे मागासवर्गाच्या प्रवर्गातील महिलांसाठी राखून ठेवण्यात येतील. मागासवर्गाच्या प्रवर्गातील व्यक्तींसाठी २७ टक्के सभापतींची पदे राखून ठेवण्यात येतील.

ग्रामपंचायत:
मागासवर्गाच्या प्रवर्गातील (ओबीसी) व्यक्तींना २७ टक्के जागा राखून ठेवण्यात येतील. मात्र ते आरक्षण ग्रामपंचयातीच्या एकूण जागांच्या ५० टक्के पुढे जाणार नाही. अनुसूचित क्षेत्रांचा समावेश असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाती व जमाती यांच्यासाठी राखून ठेवल्यानंतर उर्वरित जागा मागासवर्गाच्या प्रवर्गाला देण्यात येतील. तसेच राखून ठेवायच्या पदांच्या १/२ पदे मागासवर्गाच्या प्रवर्गातील महिलांसाठी राखून ठेवण्यात येतील. मागासवर्गाच्या प्रवर्गातील व्यक्तींसाठी २७ टक्के सरपंचपदे राखून ठेवण्यात येतील.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: No OBC reservation in the current local body elections but it will applicable in nest elections said election commission.

हॅशटॅग्स

#OBC(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x