पुणे : पुण्यातील कोथरूड मध्ये रात्री पेट घेणारी एक बस शेअर होत असली तरी वास्तविक तो व्हिडिओ जुना असून त्या व्हिडिओचा भारत बंद आणि मनसे पक्षाशी काहीच संबंध नसल्याचं उघड झालं आहे. समाज माध्यमांवरील खोडसाळ पनाचं पुन्हा दर्शन घडताना दिसत आहे. राज्यात काँग्रेसपेक्षा मनसे अधिक कार्यरत झाल्याने आंदोलनाला धार येताच, मनसे विरुद्ध जुने व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर करून जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे.
वास्तविक तो पेट घेणाऱ्या बसचा व्हिडिओ जुना आणि रात्रीचा आहे हे व्हिडिओ’मध्ये स्पष्ट दिसत आहे. तसेच भारत बंदचे परिणाम आज सकाळी दहा नंतर उमटू लागले होते. पुण्यात सकाळी एका बसवर दगडफेक झाल्याचे वृत्त आहे. परंतु बस जाळपोळीचे कोणतेही प्रकार संपूर्ण पुण्यात घडलेले नाहीत. प्रमुख आणि जीवनाश्यक वस्तुंना सुद्धा आंदोलनातून वगळण्यात आल्याने सामान्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला नाही.
सध्या मनसेचं पुण्यात प्रस्त वाढत असल्याने, त्यांचे विरोधक असले प्रकार करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे अध्यक्ष अमित शाह पुण्याच्या दौऱयावर आले असताना त्यांनी भाजपच्या सोशल मीडिया टीमची भेट घेतली होती आणि हा त्याचाच प्रत्यय असावा असं प्रथम दर्शनी समाज माध्यमांवरील फेक प्रतिक्रिया पाहून वाटत आहे.
