महत्वाच्या बातम्या
-
भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरुद्ध कलम 499, 500 नुसार चारित्र्यहननाचा गुन्हा दाखल
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचा बलात्कारी म्हणून उल्लेख करून बदनामी केल्याप्रकरणी त्यांनी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्याविरुद्ध सोमवारी चारित्र्यहननाचा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | महागाईमुळे मोदी समर्थक खासदार नवनीत कौर यांचा चुलीवर स्वयंपाक | समाज माध्यमांवर खिल्ली
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. चुलीवर भाकरी करताना खासदार कौर या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यामुळे, केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी तर त्यांनी हा व्हिडिओ बनवला नाही ना, असा प्रश्न नेटीझन्स विचारत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | दिल्लीत अमित शहा आणि शरद पवार यांची महत्वाच्या विषयावरून भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसेवा शरद पवार हे पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री आणि देशाचे नवे सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. राजधानी दिल्लीत दोघांची भेट होत आहे. या भेटीत राष्ट्रीय साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, याच संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर हे देखील त्यांच्यासोबत असणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
विरोधकांनी महागाई, इंधन दरवाढ, शेतकरी आंदोलनावरून प्रश्न विचारातच मोदींची लोकशाही, घटनेवरून ओरड सुरु
राहुल गांधी यांची विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबतची नाश्ता बैठक संपली आहे. या बैठकीनंतर राहुल गांधी सायकलवरून संसदेसाठी रवाना झाले आहेत. महागाईवर विरोधी पक्ष सरकारला घेरण्याची तयारी करत आहे. कॉन्स्टिट्यूशन क्लबची बैठक होताच काँग्रेस नेते संसदेकडे वळले. राहुलसोबत विरोधी पक्षांचे नेतेही सायकलवरून संसदेत जात आहेत.
4 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींच्या नैत्रुत्वात विरोधकांची बैठक | 100 खासदार एकवटले | संसदेवर सायकल मार्च
पेगास हेरगिरी प्रकरणावरून विरोधी पक्षांनी संसदेमध्ये सरकारला घेरण्याची तयारी चालविली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना नाष्ट्यासाठी कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये आमंत्रित केले होते. सर्व शक्तींची एकजूट करणे, ही माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची बाब असल्याचे राहुल गांधींनी बैठकीत सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेना अजून यूपीए'चा भाग नाही, आमची स्वतंत्र वाटचाल सुरू - संजय राऊत
दिल्लीत सध्या संसदेचं अधिवेशन सुरु आहे. यावेळी विरोधकांच्या मोठ्या प्रमाणावर गाठीभेटी देखील सुरु आहेत. त्यालाच अनुसरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर पुन्हा युपीए संदर्भातील चर्चा सुरु झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
चिकन, मटन, मासे न खाता गोमांस खावे, भाजपाच्या मंत्र्याचा लोकांना सल्ला | शिवसेनेसह देशभरातून संताप
राज्यातील लोकांनी चिकन, मटन आणि माशांपेक्षा जास्त गोमांस खाण्याचा सल्ला मेघालयातील भाजप नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री सबनोर शुलाई यांनी दिला आहे. लोकांनी कोणत्याही कायद्याची भीती न बाळगता मोठ्या प्रमाणात गोमांस खावे. आपला देशात लोकशाही असल्याने प्रत्येकजण जे पाहिजे ते खाऊ शकतो असेही ते यावेळी म्हणाले. ते शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
पेगासस फोन टॅपिंग | सहकाऱ्यांनाही मोदी-शहांवर विश्वास नाही | नीतीश कुमार यांची चौकशीची मागणी
मागील काही दिवसांपासून पेगासस हेरगिरी प्रकरणी संसदेत व संसदेबाहेर गोंधळ सुरू आहे. पेगासस हेरगिरी प्रकरणी चौकशी करावी व संसदेत चर्चा करावी, अशी विरोधी पक्षांनी मागणी लावून दरली आहे. तर केंद्र सरकारने चर्चा करण्याची विरोधी पक्षांची मागणी मान्य केली नाही. अशातच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील (एनडीए) सहभागी असलेल्या जनता दलाचे नेते नीतीश कुमार यांनीदेखील पेगासस प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद पंचायत समितीत राडा | भाजपच्या उपसभापतीला दालनात घुसून मारहाण
औरंगाबादच्या पंचायत समितीमध्ये काँग्रेस आणि भाजप सदस्यांत तूफान राडा झाला. पंचायत समितीचे नवनिर्वाचित उपसभापती अर्जुन शेळके यांच्या दालनात घुसून सोमवारी मारहाण करण्यात आली. काँग्रेस सदस्यांनीच ही मारहाण केल्याचा आरोप भाजपने केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, अर्जुन शेळके यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर 4 दिवसांपूर्वीच झालेल्या निवडणुकीत ते उपसभापती म्हणून निवडून आले. काँग्रेसने त्याचाच राग काढल्याचा आरोप केला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला बगल देत केवळ ‘अदानी एअरपोर्ट’ | शिवसैनिकांकडून बोर्डची तोडफोड
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात असलेल्या अदानीच्या बोर्डची शिवसैनिकांनी तोडफोड केली. विमानतळाचे संचालन अदानी ग्रुपच्या हाती गेल्यानंतर ‘अदानी एअरपोर्ट’ अशा पाट्या विमानतळ परिसरात लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी या बोर्डची तोडफोड केली. अदानी कंपनीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा विसर पडला का? असा प्रश्न विचारला.
4 वर्षांपूर्वी -
MPSC सदस्यांची यादी पाठवलीय | विधान परिषद आमदारांची यादी नसल्याने मंजूर कराल हा विश्वास - अतुल लोंढे
पुण्याच्या स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येवरुन महाराष्ट्रात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यी आणि पालकांना दिलासा देण्यासाठी तसंच एमपीएससीचा कारभार गतीमान व्हावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा केली.
4 वर्षांपूर्वी -
नारायण राणेंच्या सामना समोरच्या सभेवेळी संजय राऊत बाथरुममध्ये लपले होते - आ. नितेश राणे
भारतीय जनता पक्ष आणि प्रसाद लाड यांची सेनाभवन फोडण्याची भाषा आणि संजय राऊत यांच्या सामनातील अग्रलेखात भाजपमधील नेत्यांवर केलेली टीका, यावरुन राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असं जोरदार राजकारण आता रंगताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षात उपऱ्यांना, बाटग्यांना स्थान नव्हतं. परंतु, आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे, अशी घणाघाती टीका आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी केलीय.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुखांचे ईडीला पत्र | सुप्रीम कोर्टात आधीच आव्हान दिल्याने चौकशीसाठी हजर राहणार नाही
100 कोटी वसुली प्रकरणामुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे अडचणीत सापडलेले आहेत. या प्रकरणी त्यांना सक्तवसुली संचालनायल म्हणजेच ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे. तसेच त्यांचा – मुलगा ऋृषीकेश यांना देखील समन्स बजावण्यात आला आहे. त्यांना आज सकाळी 11 वाजता मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र तिसऱ्या समन्सनंतरही अनिल देशमुख हे ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा | मुख्यमंत्र्यांविरोधात बातम्या झळकण्यासाठी लोकांच्या आडून भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ?
सांगली, कोल्हापूर, कोकण भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती ओढावली आहे. यामुळे नागरिकांचे बरेच नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली जिल्ह्याचा दौरा करुन पूरस्थितीचा आढावा घेत आहेत. आज मुख्यमंत्री पूरबाधित गावांची पाहणी करत आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोल्हापूर दौरा केला होता.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे बरं बोलत नाहीत तर खरं बोलतात | १-२ दिवसात माझी त्यांच्याशी भेट होणार आहे - चंद्रकांत पाटील
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या युतीची चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मनसेच्या नेत्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडलेली असताना देखील भाजपकडून विरुद्ध संकेत दिले जातं आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पुजा चव्हाण आत्महत्या | त्या संवादातील राठोड नावाची व्यक्ती कोण? | रिकॉर्डिंग फॉरेन्सिक लॅबकडे पाठवलं
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी तपास करणाऱ्या पुणे पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला आहे. आत्महत्येच्या पाच दिवस आधी पूजा चव्हाण आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यात अनेकदा फोनवरुन संभाषण झालं होतं. या सर्व संभाषणांचं रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेना गुंडांचा पक्ष हे संजय राऊत यांनी मान्य केले आहे - गिरीश महाजन
शिवसेना गुंडांचे समर्थन करणारा पक्ष असून शिवसेनेत गुंड असल्याचे खा.संजय राऊत यांनी मान्य केले आहे. सत्ताधारी पक्षाने गुंडांच्या समर्थनाची भाषा करणे हे राज्याचे मोठे दुर्दैव असल्याची बोचरी टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली.
4 वर्षांपूर्वी -
यायचंय तर या…सोबत खांदेकरी घेऊन या | शिवसेनेचा भाजपाला इशारा
भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केली. त्यानंतर शिवसेना त्यांच्यावर तुटून पडली आहे. कार्यकर्ते-नेते-पदाधिकाऱ्यांनी उत्तरं देऊन झाल्यावर खुद्द मुख्यमंत्र्यांनीही थपडीची भाषा केली. आता आज सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरपार लढाईची भाषा केली आहे. शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जाण्याची वेळ येईल, असा इशारा देत यायचंय तर या मग, असं बोलावणंच संजय राऊत यांनी लाड आणि राणेंना धाडलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
बीडीडी चाळ पुनर्विकास | सेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो पाहून भाजपचा जळफळाट? | आली प्रतिक्रिया
शिवसेना-भाजप यांची प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या बहुप्रतीक्षित मुंबई महापालिका निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. बीएमसी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. म्हणजेच अद्याप जवळपास सहा महिन्यांचा कालावधी निवडणुकीला शिल्लक आहे. मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या पुनर्विकासाचा फायदा शिवसेनेला मुंबई महापालिका निवडणुकीत होणार का? असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही - देवेंद्र फडणवीस
वेळ आली तर शिवसेना भवन फोडू असं वक्तव्य केल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर शिवसैनिक तुटून पडले आहेत. त्यानंतर लाड यांनी मी केलेल्या भाषणाचा विपर्यास केला गेल्याचं म्हणत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. याच प्रकरणावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER