नवी दिल्ली : भारताने रशियासोबत महत्वाकांक्षी असा एस-४०० वायु संरक्षण प्रणाली खरेदी करार केल्यास अमेरिकेतील ट्रम्प प्रशासन भारतातील उत्पादनांवर मोठे कर लादण्याची शक्यता आहे ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजून आर्थिक संकटात जाईल अशी शक्यता आहे. भारतीय लष्कराला हवाई सुरक्षेसाठी रशियाकडून मिळणारी एस-४०० वायु संरक्षण प्रणाली सुद्धा तितकीच महत्वाची आहेत. त्यात आधीच अमेरिका आणि रशिया यांच्यात पूर्वीपासून तणावाचे संबंध राहिले आहेत.
भारताने यापूर्वी सुद्धा भारतीय लष्करासाठी महत्वाची युद्ध सामुग्री रशियाकडून खरेदी केली आहे. सुखोई हे सुपरसॉनिक लढाऊ विमान त्यातील सर्वात महत्वाचं उदाहरण आहे. पाकिस्तान आणि चीन सारखे शत्रू सीमारेषेवर लागून असल्याने एस-४०० वायु संरक्षण प्रणालीच महत्व अधिक आहे. त्यात हीच सर्व हवाई हल्ले परतवून लावणारी संरक्षण प्रणाली चीन कडे सुद्धा असल्याने भारतीय लष्करासाठी सुद्धा ते महत्वाचे आहे. त्यामुळे अमेरिकेने किती ही दबाव आणला तरी भारतीय लष्करासाठी हा करार अंमलात आणणे खूप महत्वाचे आहे.
चीनने काही दिवसांपूर्वी एस-४०० वायु संरक्षण प्रणाली खरेदी केल्यानंतर अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने चीनच्या अनेक उत्पादनांवर भरमसाट कर कडून त्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्नं सुरु केला आहे. त्यामुळे रशियासोबत जर हा करार पूर्णत्वाला गेल्यास भारतीय उत्पादनांवर सुद्धा अमेरिकेत मोठे कर लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच आर्थिक गर्तेत अडकलेली भारतीय अर्थव्यवस्था अजून दबावाखाली येण्याची शक्यता आहे.
