लखनऊ : भारतीय जनता पक्ष प्रत्येक गोष्ट इव्हेन्टसारखी लोकांपर्यंत पोहोचवत असताना आता काँग्रेसने देखील कुठेही मागे न राहण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी मुखवटे आणि टी-शर्ट घालून भाजपचे कार्यकर्ते नक्कीच पहिले असतील. परंतु, आता प्रियांका गांधींसाठी सुद्धा प्रियांका सेने सज्ज झाली आहे. काँग्रेसच्या युपीच्या महासचिव प्रियंका गांधींमध्ये दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींची छबी आहे, असे काँग्रेसबरोबरच अनेक सामान्य लोकांनां सुद्धा वाटतं. यामुळे हा दावा खरा ठरविण्यासाठी इंदिरा गांधींच्या तत्कालीन वानरसेनेच्या धर्तीवर प्रियंका सेना तयार करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या आसाममधील सिचलरच्या खासदार सुष्मिता देव यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर गुलाबी रंगातील टीशर्ट आणि त्यावर प्रियंका सेना लिहिलेले फोटो सार्वजनिक केले आहेत. या फोटोंमध्ये सुष्मिता या प्रियंका सेनेसोबत दिसत आहेत. इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्याचा आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी तरुणांसाठी ‘वानर सेना’ बनविली होती. जी विरोध प्रदर्शन आणि आदोलने काढत होती. या वानर सेनेने तत्कालीन स्वातंत्र्य लढ्यात खारीचा वाटा उचलला होता. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसससुद्धा पूर्णतः सज्ज झाली आहे, असंच म्हणावं लागेल.

priyanka sena is ready for priyanka gandhi campaign