19 March 2024 7:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 20 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 20 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Salasar Techno Share Price | अवघ्या 21 रुपयाचा शेअर वेळीच खरेदी करा, खरेदीनंतर संयम मोठा परतावा देईल RailTel Share Price | कमाईची संधी! अवघ्या 3 दिवसांत 20% परतावा आणि 7 दिवसात कंपनीला 3 कॉन्ट्रॅक्ट मिळाले Zomato Share Price | पैशाने पैसा वाढवा! झोमॅटो शेअर 200 टक्केपर्यंत परतावा देईल, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला Paytm Share Price | सुवर्ण संधी! 63 टक्क्यांनी स्वस्त झालेला पेटीएम शेअर 40% परतावा देईल, टार्गेट प्राइस जाणून घ्या DroneAcharya Share Price | अल्पावधीत मजबूत परतावा देतोय हा शेअर, वेळीच खरेदी करा, ऑर्डरबुक मजबूत झाली
x

निवेदन कसे स्वीकारावे माहित नसलेल्या तावडेंकडून प्रियंका गांधींची शूर्पणखेशी तुलना

भिवंडी : सध्या प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात उतरल्याने भारतीय जनता पक्षाचे नेते बिथरल्यासाखे दिसत आहेत. कारण तशाच काहींच्या प्रतिक्रिया भाजप नेते मंडळी आणि मंत्र्यांकडून येऊ लागल्या आहेत. राज्याचे सांस्कृतिक आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे नुकतेच काही फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. त्यामध्ये भेटीसाठी आलेल्या सामान्य लोकांकडून ते कशा प्रकारे आणि रुबाबात निवेदनं स्वीकारतात त्याचा प्रत्यय आला होता.

आता पुन्हा त्याच विनोद तावडे यांनी प्रियांका गांधी यांच्या बाबतीत एक असभ्य तुलना केली आहे. विनोद तावडे म्हणाले की, ‘रावणाने बहीण शूर्पणखा, हिरण्यकश्यपूने होलिका आणि कंसाने पूतनामावशीस विरोधकांविरुद्ध वापरल्याचा इतिहास आहे. परंतु, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आता राहुल गांधी यांनी सुद्धा प्रियंका गांधींना प्रचारात उतरविले असून त्यांना सुद्धा पुन्हा पराभवालाच सामोरे जावे लागेल. पुढील काही वर्षांनी प्रियंकांचा मुलगा देखील प्रचारात उतरलेला आपणास पाहावयास मिळेल, अशी टीका राज्याचे शिक्षणमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी रविवारी भिवंडी येथे भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत केली.

भिवंडी तालुक्यातील अंजूर येथे ठाणे व पालघर विभागांतील भिवंडी, कल्याण, पालघर व ठाणे या चार लोकसभा मतदारसंघांतील शक्तिप्रमुखांची बैठक रविवारी आयोजित करण्यात आली होती. विरोधकांवर आणि विशेष करून महिलांवर भाष्य करताना भाजपच्या नेत्यांची अनेकवेळा विचारांची पातळी घसरताना दिसत आहे आणि त्यातीलच हे अजून एक उदाहरण म्हणावं लागेल.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x