26 July 2021 3:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

मोदींनी पाकशी चर्चेची संधी सोडू नये, राज ठाकरेंचे आवाहन - सविस्तर वृत्त

Raj thackeray, raj thakare, narendra modi, imran khan, pulwama attack, indian army, indian air force, maharashtra navnirman sena

२७ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला शांततेच्या मार्गाने चर्चेतून हा विषय सोडवू असे आवाहन केले आहे. त्यांनी भारत सरकारला पुलवामा हल्ल्याबद्दल पाकिस्तान कनेक्शन चे पुरावे द्यावे, जेणेकरून आम्ही त्यावर पूर्ण सहकार्य करत हवी ती मदत करू असे आवाहन केले होते. आणि काल पुन्हा त्यांनी भारत सरकारला शांततेच्या मार्गाने चर्चेतून हा विषय सोडवू असे आवाहन केले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राज ठाकरेंनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेज वर जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे कि, जर पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी चर्चेचे निमंत्रण दिले आहे तर त्यांनी ताबडतोब भारतीय वैमानिक अभिनंदन यांना भारतात परत पाठवावे आणि बॉर्डरवर होणारा गोळीबार थांबवावा. म्हणजेच आपण खरंच शांततेच्या मार्गाने हा विषय सोडवण्याच्या मानसिकतेत आहेत हे स्पष्ट होईल.

राज ठाकरेंच्या मते जर पाकिस्तान सरकार वैमानिक अभिनंदन यांना सोडत असेल आणि चर्चेसाठी तयार असेल तर मोदींनीहि या चर्चेला तयारी दाखवावी. अशीच चर्चेतून मार्ग काढण्याची संधी स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयीजी आणि जनरल मुशर्रफ यांना मिळाली होती आणि त्याचा योग्य वापर करत अटलजींनी समझोता एक्स्प्रेस सुरु केली. आग्र्यात ऐतिहासिक चर्चा झाली पण दुर्दैवाने ह्या चर्चा पूर्णत्वाला जाऊ शकल्या नाहीत.

जी संधी अटलजींच्या काळात दोन्ही देशांच्या हातून निसटली आहे ती संधी पुन्हा आपल्यासमोर आहे. जर उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया सारखे कट्टर शत्रुराष्ट चर्चेतून मार्ग काढत असतील तर आपण का नाही. युद्ध हे दोन्ही देशांच्या भल्याचे नाही त्यामुळे महागाई बोकाळले आणि काश्मिरी जनतेला याचा नाहक त्रास होईल. तसेच युद्ध हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही. युद्ध दोन्ही देशांना कित्तेक वर्ष मागे घेऊन जाईल.

युद्ध आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून कोणीही याचा राजकीय फायदा घेऊ नये. राज ठाकरेंच्या मते दोन्ही देशांनी चर्चेतून मार्ग काढावा आणि दोन्ही देशात शांततेचं वातावरण निर्माण करावं.

शेवटी राज ठाकरेंनी आपल्या पत्रात म्हटले आहे “मी पुन्हा एकदा सांगतो कि युद्ध अथवा युद्धजन्य परिस्थिती हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर होऊ शकत नाही, आणि त्याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करणे हे कोणत्याही उमद्या राजकारण्याचं लक्षण असू शकत नाही, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं”.

सविस्तर पत्र खालील प्रमाणे:

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x