17 April 2024 4:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 17 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस
x

महिलांविरोधातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक, पण राजकारण नको – पंतप्रधान

लंडन : कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणावर मौन बाळगल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देशभरातून टीका होत होती. त्यात उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपचा आमदारच आरोपी आहे तर कठुआ बलात्कार प्रकरणी भाजपचे आमदार आरोपींच्या समर्थन करत होते त्यामुळे परिस्थिती आधीच चिघळली.

विरोधकांनीं सुद्धा भाजप सरकारवर आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. देशभरात संतापाची लाट उसळली असताना नरेंद्र मोदी मात्र या विषयावर कोणतीच प्रतिक्रिया देत नसल्याने परिस्थिती आणखीच चिघळली होते. २०१२ मध्ये निर्भया प्रकरणात देशभरात आणि संसदेत रान उठवणाऱ्या भाजपने त्यांच्या राज्यांत जेंव्हा हे घडू लागलं तेंव्हा भाजपचे नेते मूग गिळून बसले होते आणि त्यामुळे देशभरात संतापाची लाट वाढतच गेली.

सध्या ब्रिटन दौऱ्यावर असलेले पंतप्रधान यांनी जागतिक मंचावरून म्हणजे लंडनमधल्या ऐतिहासिक टाऊन हॉलमध्ये ‘भारत की बात, सबके साथ’ या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महिलांविरोधातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक बाब असल्याचे मोदींनी मान्य केले परंतु अशा विषयांचं राजकारण करता कामा नये असं ही त्यांनी म्हटले आहे.

लंडनमधल्या टाऊन हॉलमध्ये उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, बलात्कार हा बलात्कार असतो. त्याचे कोणी राजकारण करु नये असं सुद्धा त्यांनी मत मांडल. कोणत्याही लहान मुलीवर जेंव्हा बलात्कार होतो तेंव्हा केवळ एक वेदनादायी घटना असते. तुमच्या सरकारमध्ये इतके बलात्कार झाले, माझ्या सरकारमध्ये इतके बलात्कार होतात असे आपण म्हणू का? बलात्कार हा बलात्कार असतो. एका मुलीबरोबर अत्याचार आपण कसा सहन करु शकतो ? असे मोदी म्हणाले. मुलींना आदराने वागवायचे असते हे मुलांना शिकवण्याची गरज आहे. मुलगी उशिरा घरी आली तर उशीर का झाला ? कुठे गेली होतीस ? कोणाला भेटलीस ? असे प्रश्न विचारतात. पण हेच प्रश्न मुलगा जेव्हा घरी उशीरा येतो तेव्हा त्याला सुद्धा विचारा असे मोदी म्हणाले.

विशेष म्हणजे जे मुद्दे पंतप्रधानांनी लंडनमधल्या टाऊन हॉलमध्ये मांडले ते भारतात का नाही मांडले असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x