नवी दिल्ली : एनसीपीचे राष्ट्रीय सचिव तसेच खासदार तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शरद पवारांना जोरदार राजकीय धक्का दिला आहे. लोकसभेतल्या खासदारकीचा सुद्धा त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवारांनी एका मुलाखतीदरम्यान राफेल लढाऊ विमानांच्या करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीन चिट दिली होती. तसेच नरेंद्र मोदींच्या हेतूवर सुद्धा जनतेला संशय नसल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं होत.
दरम्यान, एका बाजूला काँग्रेस अध्यक्ष राफेल करारावरून मोदी सरकारविरोधात रान पेटवत असताना पवारांनी सर्वांनाच आश्चर्यचकित करायला लावणारी भूमिका घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पवारांनी अशी भूमिका घेतल्यानंतर अनेक राजकीय तज्ज्ञांनी असं मत नोंदवलं होत की, राफेल कारणावरून राहुल गांधी यांनी ज्याप्रकारे मोदी सरकारला धारेवर धरलं की त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ राहुल गांधींविरोधात आक्रमक झालं आणि त्यामुळे ‘राहुल गांधी तो छा गये’ असं एकूणच वातावरण झालं होत. परंतु राहुल गांधींची ती हवा काढून टाकण्यासाठीच एका मुलाखतीदरम्यान राफेल करारावर मोदींना क्लीनचिट देणारी वेगळीच भूमिका घेतली होती आणि भाजपाला आयतच कारण दिल होत.
परंतु, त्यानंतर राष्ट्रवादीने सारवासारव करत माध्यमांनी पवारांच्या त्या वाक्याचा विपर्ह्यास केला अशी प्रतिक्रिया दिली आहे. पवारांच्या त्या वक्तव्यामुळे आता त्यावर [पक्षातीलच ज्येष्ठ मंडळी नाराज झाल्याचे चित्र आहे. अगदी पक्षाच्या स्थापनेपासून पवारांचे अत्यंत विश्वासू असलेले तारिक अन्वर यांनीच पक्षाला आता सोडचिट्टी दिली आहे.
NCP national general secretary Tariq Anwar quits the party, also resigns from the post of Lok Sabha MP. (File pic) pic.twitter.com/vX4ablr9fL
— ANI (@ANI) September 28, 2018
