मुंबई : महाराष्ट्र शासनाने सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्ष पदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याने साहजिकच शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा प्राप्त होणार आहे.
आदेश बांदेकर हे शिवसेनेत सध्या सचिव या पदावर असून, शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या मुंबईच्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष पद त्यांना देण्यात आले होते.
यापूर्वी आदेश बांदेकरांनी दादर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती, परंतु त्यावेळी ते मनसेचे तत्कालीन उमेदवार नितीन सरदेसाई यांच्या विरुद्ध लढताना पराभूत झाले होते.
