मुंबई : केंद्रात आणि राज्यात डझनभर मंत्रिपद उपभोगून सतत सहकारी पक्ष भाजपवर विखारी आगपाखड करणारे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देऊन पलटले आहेत. दरम्यान संपूर्ण सत्ताकाळ राजीनामा नाट्यात व्यर्थ घालवल्यानंतर मागील काही महिन्यापासून अनेक वेळा स्वबळाच्या जाहीर घोषणा देखील स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत. भाषणादरम्यान ऐतिहासिक दाखले देताना अफजलखान आणि अफजखानाच्या फौजा अशा भाजप आणि भाजपच्या नेत्यांचे नामकरण करण्यात शिवसेना उद्धव ठाकरे यांनी ५ वर्ष खर्ची घातली. परंतु, निवडणुका जवळ येताच ज्यांना अफजखान संबोधलं, त्यांचीच आता हसत गळाभेट घेण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वबळाच्या घोषणेवर विश्वास ठेवून अनेक नेतेमंडळींनी त्यांच्या मतदारसंघात मोठी तयारी सुरु केली होती. भावी आमदार आणि भावी खासदार म्हणून स्वप्नं पाहणारे अनेक वरिष्ठ शिवसैनिक पदाधिकारी पक्षप्रमुखांवर विश्वास ठेवून कामाला लागले होते. त्यात अनेकांनी मागील ३-४ वर्ष मोठा पैसा देखील खर्ची घातला होता. परंतु, निवडणुका जवळ येताच उद्धव ठाकरेंनी युती करण्याच्या निर्णय घेतला आणि अनेकांचा हिरमोड झाल्याचे समजते. त्यात पहिली ठिणगी जालन्यात पडण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना आमदार तसेच मंत्री अजून खोतकर हे युती झाल्यानंतर देखील भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मी पक्ष सोडणार नसून, माझे सर्वच पक्षात मित्र आहेत असं विधान अजून खोतकर यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी दिवसात शिवसेनेत मोठी फूट पडण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

परंतु, मागील काही दिवसांपासून शिवसेनेबद्दल अनेक नकारात्मक निवडणूकपूर्व सर्व्ह प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे वरवर दिसणारी देहबोली आतून भेदरल्यासारखी होती याचा प्रत्यय आज आला आहे. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच निवडणुकीआधी चालविचल झाल्याचं हे उदाहरण म्हणावं लागेल. कारण मागील २-३ वर्षांपासून उद्धव ठाकरे भविष्यात शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढवेल अशी घोषणा करत आले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी ही घोषणा करताना शिवसैनिकांकडून जाहीरपणे हात वर करत वचन घेतलं होतं.

मात्र शिवसैनिकांकडून घेतलेल्या स्वबळाच्या जाहीर वाचनाला स्वतःच तीरांजली दिल्याने शिवसैनिक तोंडघशी पडले आहेत. स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून घेतलेल वचन स्वतःच पक्षाध्यक्षांनी मोडल्याने आता बोलणार तरी कोण अशी अवस्था कार्यकर्त्यांची झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पक्षाध्यक्षांच्या स्वबळाच्या घोषणेमुळे आपापल्या प्रभागात कामाला लागलेल्या कार्यकर्त्यांचा पुरता हिरमोड झाल्याचे शिवसैनिक बोलून दाखवत आहेत.

shivsena minister arjun khotkar may contest loksabha election from Jalana against BJP MP Raosaheb Danave even after alliance with shivsena