मुंबई : आज महागाई विरोधात विरोधकांनी भारत बंद’ची हाक दिली आहे. भर सणासुदीच्या दिवसात सामान्य लोकं महागाईने होरपळून निघाले आहेत. त्यात शिवसेना एका बाजूला सत्तेत सामील होऊन केवळ भाजपवर टीका करण्यात व्यस्त आहे. भाजपने देशवासियांना दिलेली आश्वासन पूर्ण केली नाहीत आणि भाजप म्हणजे केवळ जाहिरातबाजीचे सरकार अशी टीका करण्यात व्यस्त आहे.
आज भारत बंद’वरुन शिवसेनेने विरोधकांवर टीका करताना ‘महागाईच्या विषयावर जनता जागीच आहे, ती २०१९ ला भाजपची लंका दहन करेल’ असं विधान केलं आहे. परंतु शिवसनेच्या या विधानाचा म्हणजे ”महागाईच्या विषयावर जनता जागीच आहे’ मथळ्याचा समाज माध्यमांवर समाचार घेतला जात असून, शिवसेनेने सुद्धा लोकांना २०१४ च्या निवडणुकीत महागाई या विषयावर जाहिरातबाजी करून ‘सत्ता बदल झालाच पाहिजे’ असं मार्केटिंग केलं होत. आज तीच शिवसेना केवळ भाजपाला जाहिरातबाजीचे सरकार म्हणून ओरडत असली तरी, त्यांनी सुद्धा निवणुकीपूर्वी जनतेला भाजप’सारखीच आश्वासन देऊन जाहिरातबाजी केली होती, याची आठवण समाज माध्यमं करून देत आहेत.
काय जाहिरातबाजी केली होती शिवसेनेने महागाईवरून निवडणुकीपूर्वी ?
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		