मुंबई : आगामी निवडणूका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतशी शिवसेनेतील मुलुंडमधील पक्षांतर्गत गरामागरमी सुद्धा बाहेर येऊ लागली आहे. परंतु ईशान्य मुंबईतील महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमधील थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या समोरच ईशान्य मुंबईच्या महिला विभाग संघटक संध्या वढावकर यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला.

दृष्टिहीन व्यक्तींना सुद्धा ज्ञानेश्वरी वाचता यावी यासाठी ‘दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनने’ ब्रेल लिपीतील ज्ञानेश्वरी ग्रंथ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी शिवसेना भवनमध्ये प्रकाशित करण्यात आला. तो कार्यक्रम उरकून उद्धव ठाकरे सेना भवनातून खाली उतरताच हा प्रकार घडल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी महिला पदाधिकाऱ्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या आणि संबंधित वाद काय नक्की काय आहे ते समजून घेण्याची सर्व जबाबदारी शिवसेना नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे या तक्रारदार महिला पदाधिकारी आणि ईशान्य मुंबईच्या महिला विभाग संघटक संध्या वढावकर यांच्यात भविष्यात राजकीय खटके उडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

tussle between shiv sena mulund women wing in front of shivsena chief udhav thackeray