शिर्डी : काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिर्डी येथे पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. दरम्यान, उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर घणाघात केला. माझ्या रक्तातच लाचारी नाही आणि मी सत्तालोलूप सुद्धा नाही, पण तुम्ही तर चक्क खोटे बोलून सत्ता मिळविली ना? खोटे बोलून सत्ता मिळविणे हा औढा देशद्रोहच आहे, अशा तिखट शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर प्रहार केले.

दरम्यान, पंतप्रधानांच्या शिर्डी दौऱ्या पाठोपाठ रविवारी शिर्डीत येऊन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे म्हटले जात आहे. मुंबईतील दसरा मेळाव्यात मोदींवर करण उद्धव ठाकरे यांनी टाळलं असताना कालच्या भाषणात मात्र त्यांनी मोदींनाच लक्ष्य केलं होते. तसेच भाषादरम्यान टायटीनी ‘कसं काय पाहुणं बरं हाय का’ हे गाणे म्हणत त्यांनी मोदींच्या मराठी भाषेतील सुरुवातीची खिल्ली सुद्धा उडवली.

५ वर्षे सत्ता घेऊन तुम्ही असे काय दिवे लावले? असा सवाल साईबाबांनी त्यांना केला असेल असं म्हणत त्यांनी मोदींच्या प्रार्थनेची खिल्ली उडवली. खोटे बोलण्यात मोदी पटाईत आहेत. आता २०२२ पर्यंत सगळ्यांना घरे देणार, असे सांगून शिर्डीत येऊन फक्त चावी मारून गेले,’ असा सणसणीत टोला सुद्धा त्यांनी नरेंद्र मोदींच नाव न घेता लगावला. शिवसेना सत्तेतून का बाहेर पडत नाही, असा सवाल करणाऱ्यांना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी प्रतिउत्तर दिले. ‘आम्ही सत्तेतून कधी सुद्धा बाहेर पडू शकतो, पण सत्तेत राहून त्यांच्या डोक्यावर बसून काम करून घेता येत असेल तर का बाहेर पडायचे? शेतकऱ्यांचे प्रश्न, दुधाला भाव, पाणी देत असाल, तर ५०० वर्षे सत्ता देऊ, पण तुम्ही केवळ खोटे बोलून सत्ता मिळविता़, असा हल्लाबोल त्यांनी पंतप्रधानांवर केला आहे.

दरम्यान, कालच्या सभेत भाजपची राजकीय कोंडी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न दिसून आला. कारण राम मंदिर, समान नागरी कायदा, ३७० कलम ही सगळी तुमची जुमलेबाजी आहे का, असा सवाल करत ‘मंदिर नही बनायेंगे’ असे एकदा देशवासियांना सांगून टाका़, मग आम्ही काय करायचे ते करतो़, असे थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले आहे.

uddhav thackeray criticised bjp and narendra modi over ram mandir issue at shirdi speech