
Post Office Investment | भारतीय टपाल सेवा ऑनलाइन सुविधा सुरू झाल्याने आता राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) आणि किसान विकास पत्र (केव्हीपी) खाती उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी ग्राहकांना पोस्ट ऑफिसमध्ये येण्याची गरज भासणार नाही. घरात बसल्या बसल्या ऑनलाईन ओपन आणि क्लोज करता येणार आहे.
इंटरनेट बँकिंग :
टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी इंटरनेट बँकिंग आवश्यक आहे. एखाद्याला एनएससी किंवा केव्हीपी खाते उघडायचे असेल तर त्याला प्रथम पोस्ट खात्याकडून (डीओपी) इंटरनेट बँकिंगची सुविधा घ्यावी लागेल. पोस्ट विभागाद्वारे चालविल्या जाणाऱ्या डीओपी इंटरनेट बँकिंगचा वापर करणारे खातेदार त्यांच्या घरून आरामात एनएससी आणि केव्हीपी खाती उघडू शकतात.
केव्हीपी ही टपाल खात्याची अल्पबचत योजना आहे, असे ते म्हणाले. याअंतर्गत जमा केलेली रक्कम खाते उघडल्यापासून १० वर्षे चार महिन्यांनी मॅच्युअर होते. या बचत योजनेअंतर्गत खाते उघडणाऱ्या लाभार्थ्यांना ६.९ टक्के चक्रवाढ दराने व्याज मिळते. एनएससी पोस्ट विभागाच्या अल्पबचत योजनांद्वारे बचत प्रमाणपत्रे उपलब्ध आहेत. पाच वर्षांनंतर ठेवी परिपक्व होतात आणि सध्या ही योजना ६.८ टक्के दराने व्याज देत आहे.
पोस्टल अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा खाते उघडण्याची किंवा बंद करण्याची सेवा विनंती सामान्य सेवा पर्यायाकडे जाईल तेव्हा एनएससी आणि केव्हीपी खात्याचा पर्याय येईल. एनएससी खाते कमीत कमी रुपयात सुरु करता येऊ शकते.
घरबसल्या अर्ज करून :
ते म्हणाले की, पोस्ट खात्याद्वारे एनएससी आणि केव्हीपीसाठी प्रमाणपत्र देण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे. आता त्याची खाती उघडण्यात आली आहेत. एनएससी आणि केव्हीपी खाते क्रमांक ग्राहकांना दिले जातात. ग्राहकांना पासबुक दिले जातात. कोणतीही व्यक्ती घरबसल्या अर्ज करून आपले खाते बंद करू शकते किंवा उघडू शकते, मात्र त्यासाठी ग्राहकांना इंटरनेट बँकिंगची सुविधा घ्यावी लागणार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.