12 December 2024 1:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त
x

Stock in Focus | होय! मजबूत परतावा देणारा शेअर 49% स्वस्तात खरेदीची संधी, फायद्याची स्टॉक डिटेल्स नोट करा

Stock In Focus

Stock in Focus | राजापालयम मिल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांसाठी राइट्स इश्यू जाहीर केला आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत आपल्या विद्यमान शेअर धारकांसाठी राइट्स इश्यूचा प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ही स्मॉल कॅप कंपनी 1938 साली स्थापन करण्यात आली होती. या कंपनीचे बाजार भांडवल 607.85 कोटी रुपये असून ही कंपनी मुख्यतः वस्त्रोद्योग क्षेत्रात कार्यरत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rajapalayam Mills Share Price | Rajapalayam Mills Stock Price | BSE 532503)

राइट्स इश्यू बद्दल डिटेल्स :
राजापालयम मिल्स लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियमन सेबी दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनी राइट इश्यूद्वारे 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले 6,14,680 शेअर जारी करणार आहे. या राइट्स इश्यूमध्ये शेअरची 569 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या कंपनीने राईट्स इश्यूसाठी 30 डिसेंबर 2022 ही रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. राइट्स इश्यू अंतर्गत कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची प्रथम संधी देते, आणि यात स्टॉकची किंमत ट्रेडिंग किमतीच्या तुलनेत कमी असते. म्हणजेच शेअर धारकांना स्वस्तात शेअर्स खरेदी करण्याची संधी मिळते.

कंपनीची कामगिरी थोडक्यात :
आज BSE निर्देशंकावर राजापालयम मिल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.14 टक्के वाढीसह 728.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 51.25 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्याचबरोबर एक वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअर मध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य 26.31 टक्क्यांनी कमी झाले आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1398 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 700 रुपये होती. सध्या या कंपनीचे शेअर्स आपल्या 1 वर्षाच्या सर्वोच्च किंमत पातळीच्या तुलनेत 49.47 टक्क्यांनी खाली ट्रेड करत आहेत. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीपर्यंत या कंपनीच्या प्रमोटर्सकडे एकूण 55.12 टक्के भाग भांडवल होते, तर किरकोळ गुंतवणूकदारांकडे एकूण 44.88 टक्के भाग भांडवल आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Rajapalayam Mills Share Price in Focus over huge returns check details on 26 December 2022.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x