 
						Post Office Scheme | पोस्ट ऑफिस अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच सर्वसामान्य व्यक्तींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबविल्या जातात. नागरिकांना पोस्टाच्या योजनेत आपले पैसे गुंतवणे सुरक्षिततेचे आणि फायद्याचे वाटते. पोस्टाच्या योजनांमध्ये चांगल्या दर्जाचे व्याजदर मिळते ज्यामुळे नागरिकांना किंवा खातेधारकांना आपल्या पैशांच्या गुंतवणुकीवर व्याजदरानेच लाखो रुपये कमावता येतात.
आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या टीडी म्हणजे टाईम डिपॉझिट योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत. टाईम डिपॉझिट योजनेत एकूण किती टक्के व्याजदर दिले जाते, त्याचबरोबर मॅच्युरिटी पिरियडच्या वर्षांपर्यंत तुम्ही 5,00,000 रुपयांची गुंतवणूक केली असता व्याजदरानुसार तुम्हाला किती परतावा मिळेल या सर्व गोष्टींची पूर्तता आज आपण करणार आहोत.
पोस्टाची TD देते एवढे व्याजदर :
पोस्टाच्या अंतर्गत चालणाऱ्या TD टाईम डिपॉझिट योजनेमध्ये सध्याच्या घडीला 7.5% टक्के व्याजदर दिले जात आहे. पोस्टाची टीडी जास्त व्याजदर देत असल्यामुळे नागरिकांना फक्त व्याजानेच लखपती बनता येणार आहे. समजा तुम्ही 10 वर्षांसाठी 1 लाख ते 5 लाखांपर्यंत गुंतवणूक केली तर, तुम्हाला मॅच्युरिटी पिरियडपर्यंत वेगवेगळ्या गुंतवणुकीनुसार किती पैसे परताव्याचे मिळतील. पहा कॅल्क्युलेशन.
1,00,000 रुपयांचे कॅल्क्युलेशन :
एखाद्या व्यक्तीने 10 वर्षांसाठी टाईम डिपॉझिट योजनेत 1,00,000 लाख रुपये गुंतवले असता त्याला 1,10,235 रुपये व्याजाचे मिळतील. म्हणजेच एकूण रक्कम 2,10,235 एवढी असेल.
2,00,000 लाख रुपयांचे कॅल्क्युलेशन :
जर तुम्ही 2,00,000 लाख रुपये 10 वर्षांसाठी गुंतवत असाल तर फक्त व्याजाचे तुम्हाला 2,20,470 रुपये मिळतील. संपूर्ण कॅल्क्युलेशन लक्षात घेता मॅच्युरिटी पिरियडवर तुमच्या खात्यात एकूण 4,20,470 एवढी रक्कम जमा होईल.
3,00,000 रुपयांचे कॅल्क्युलेशन :
एखादा व्यक्ती पोस्टाच्या टीडी योजनेमध्ये 3,00,000 लाख रुपये गुंतवत असेल आणि गुंतवणुकीचा कार्यकाळ 10 वर्षांचा असेल तर, तो व्यक्ती दिलेल्या केवळ व्याजदरानेच 3,30,705 रुपये मिळतील. त्याचाच अर्थ मॅच्युरिटी पिरियडवर तुम्हाला 6,30,705 एवढी रक्कम मिळेल.
4,00,000 जमा केल्यानंतर एवढा मिळेल परतावा :
7.5 % व्याजदरानुसार एखादा व्यक्ती पोस्टाच्या टीडी योजनेमध्ये 4,00,000 लाख रुपये जमा करत असेल तर, 10 वर्षानंतर त्याला 8,40,940 रुपये मिळतील. म्हणजेच केवळ व्याजदराचे 4,40,940 रुपये होतील.
5,00,000 लाखांच्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल :
समजा एखाद्या व्यक्तीने 10 वर्षांसाठी लागू व्याजदरानुसार पोस्टाच्या टीडी खात्यात 5,00,000 लाख रुपयांची मोठी अमाऊंट जमा केली असेल तर, दिलेल्या वर्षांच्या कार्यकाळात व्याजदराचे 5,51,175 एवढं व्याजदर मिळतं. याचाच अर्थ संपूर्ण मॅच्युरिटी पिरियडनंतर त्या व्यक्तीला तब्बल 10,51,175 लाख रुपये मिळतील.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		