 
						Post Office Scheme | सध्याच्या शेअर माक्रेट आणि म्युच्यूअलफंडच्या काळात देखील पोस्टाच्या बचत योजना लोकप्रीय आहेत. अनेक व्यक्ती वर्षांनुवर्षे पोस्टाच्या योजनेत गुंतवणूक करत आहेत. पोस्ट ऑफिसच्या सर्वच योजना सरकार मान्य असल्याने अनेकांनी यात गुंतवणूक केली आहे.
ग्राम सुरक्षा ही देखील पोस्टची एक अशी योजना आहे ज्यात जास्त प्रमाणात व्याजाचा परतावा दिला जातो. त्यामुळे तुम्ही अजून कुठे गुंतवणूकीला सुरूवात केली नसेल तर या योजनेचा विचार करणे तुम्हाला फायद्याचे ठरेल. कारण यात खुप कमी रकमेपासून गुंतवणूक सुरू करता येते. यात रोजचे ५० रुपये गुंतवले तर तुम्हाला ३५ लाखांपर्यंत परतावा मिळवता येईल.
पोस्टल जीवन विमा योजने अंतर्गत ग्राम सुपक्षा योजना १९९५ साली सुरू करण्यात आली. या योजनेत गुंतवणूक करणा-या व्यक्तीला निश्चितपणे ३५ लाख रुपये मिळवता येतात. वयाची ८० वर्षे पूर्ण झाल्यावर याचा लाभ घेता येतो. मात्र ८० वर्षे सदर व्यक्ती जगली नाही तर त्याच्या मृत्यू नंतर संपूर्ण रक्कम नॉमिनीला मिळते.
कोण करु शकतं गुंतवणूक
या योजनेत कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. यासाठी वयाची अट देण्यात आली आहे. या योजनेत १९ ते ५५ वर्षांच्या व्यक्ती गुंतवणूक करू शकतात. तसेच किमान गुंतवणूक ही १०,००० रुपयांची आहे तर कमाल गुंतवणूक १० लाखांची आहे. तसेच प्रीमियम भरण्यासाठी देखील विशेष सवलत आहे. या योजनेत तुम्ही सहामाई, त्रैमासीक, मासिक असे पैसे भरू शकता.
कर्ज घेण्याची मिळेल मूभा
पॉलिसी सुरू केल्यावर जर एखादा प्रीमिअम भरण्यास उशीर झाला तर तुम्ही डिफॉल्टर लिस्टमध्ये येता. मात्र नंतर ते पैसे पुर्ण भरल्यावर दुस-याच महिन्यात तुम्हाला डिफॉल्टर लिस्टमधून काढले जाते. तसेच पॉलिसीची चार वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला कर्ज घेता येते. त्या आधी तुम्ही कर्जासाठी पात्र नसता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		