
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ योजनेत तुम्हाला करोडपती बनण्याचे सामर्थ्य आहे. करोडपती होण्यासाठी तुम्हाला या योजनेत दररोज 417 रुपये जमा करावे लागेल. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्ष निश्चित करण्यात आला असून, तुम्ही तो दर 5-5 वर्षानी दोन वेळा वाढवू शकता. यासोबतच या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर मध्ये सवलतही मिळेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला वार्षिक 7.1 टक्के दराने व्याज परतावा दिला जाईल. ही योजना तुम्हाला दरवर्षी चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा कमावून देईल. चला तर मग जाणून घेऊ, ही योजना तुम्हाला किती काळात करोडपती बनवू शकते.
PPF खात्याचे तपशील :
जर तुम्ही PPF योजनेत 15 वर्षे म्हणजे मॅच्युरिटी पूर्ण होईपर्यंत गुंतवणूक केली आणि त्यात कमाल 1.5 लाख रुपये वार्षिक जमा केले, तर एका महिन्यात 12500 रुपये आणि एका दिवसात 417 रुपये या हिशोबाने 15 वर्षात तुमची एकूण गुंतवणूक 22.50 लाख रुपये जमा होईल. योजनेच्या परिपक्वतेच्या वेळी, तुम्हाला गुंतवणुकीवर 7.1 टक्के वार्षिक व्याज दराने चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा दिला जाईल. यामध्ये, मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला एकूण 18.18 लाख रुपये व्याज परतावा म्हणून दिले जातील, म्हणजेच तुम्हाला मिळणारी एकूण रक्कम 40.68 लाख रुपये असेल.
करोडपती कसे व्हाल? :
समजा जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करून करोडपती व्हायचे असेल, तर तुम्ही या योजनेत 15 वर्षानंतर कालावधी आणखी 5-5 वर्ष दोन वेळा वाढवू शकता. दर वर्षी जर तुम्ही या योजनेत 1.5 लाख रुपये जमा केले तर, तुमची एकूण गुंतवणूक 37.50 लाख रुपये असेल ज्यावर तुम्हाला मॅच्युरिटीनंतर तुम्हाला 7.1 टक्के व्याजदराने 65.58 लाख रुपये परतावा मिळेल. म्हणजेच 25 वर्षांनंतर तुमच्याकडे 1.03 कोटी रुपयेचा निधी तयार झाला असेल.
PPF खाते उघडण्याची पात्रता :
कोणतीही पगारदार, स्वयंरोजगार, पेन्शनधारक इत्यादींसह कोणताही भारतीय रहिवासी पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ स्कीममध्ये खाते उघडून गुंतवणूक करू शकतो. एका व्यक्तीच्या नावे एकच खाते उघडता येईल. या योजनेत तुम्ही संयुक्त खाते उघडू शकत नाही. अल्पवयीन मुलाच्या नावाने पालक पोस्ट ऑफिसमध्ये PPF खाते उघडून गुंतवणूक करू शकतात. अनिवासी भारतीय या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. जर तुम्ही भारतीय रहिवासी असाल आणि तुमच्या PPF खात्याच्या मॅच्युरिटीपूर्वी तुम्ही एनआरआय झाला तर, तुम्ही मॅच्युरिटी पूर्ण होईपर्यंत तुमचे PPF खाते चालू ठेवू शकता.
आवश्यक कागदपत्रे :
* ओळखीचा पुरावा : वोटर आयडी किंवा पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड.
* पत्ता पुरावा : मतदार आयडी, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड.
* सध्याचा नवीन पासपोर्ट साइज फोटो
* ऑनलाईन सबमिट केलेला PPF फॉर्म
पीपीएफ खात्याची वैशिष्ट्ये :
1) ठेवीदार एका आर्थिक वर्षात PPF खात्यात कमाल 1.5 लाख रुपये जमा करू शकतो.
2) PPF खात्यात ठेवींची संख्या वार्षिक 12 आहे. म्हणजे तुम्ही या खात्यात एका वर्षात फक्त 12 वेळा पैसे जमा करू शकता.
3) PPF ही EEE प्रकारची गुंतवणूक आहे. म्हणजेच गुंतवलेली मूळ रक्कम, मिळालेले व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम ही संपूर्णपणे करमुक्त राहील.
4) खाते सक्रिय ठेवण्यासाठी तुम्हाला किमान 500 रुपये जमा करणे आवश्यक आहे.
5) PPF खात्यावर मिळणारे व्याज चक्रवाढ पद्धतीने दिले जाते, आणि दरवर्षी 31 मार्च रोजी खात्यात जमा केले जाते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.