
PPF Scheme | पीपीएफ खाते म्हणजेच ‘पब्लिक प्रॉव्हिडंट फंड’ या सरकारी योजनेमध्ये भारतीय नागरिक आपले पैसे गुंतवतात आणि चांगल्या व्याजदरासह मोठी रक्कम परत मिळवतात. ही एक प्रकारची योजना असून केंद्र सरकार पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड चालवते. या खात्यामध्ये भारताचा कोणताही नागरिक सहभाग दर्शवू शकतो.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हे खाते तुम्ही केवळ बँकांमध्येच नाही तर पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन देखील उघडू शकता. त्याचबरोबर भारतातील कोणत्याही बँकेत तुम्हाला पब्लिक प्रोव्हिडेंट फंड खातं उघडता येईल. पीपीएफ खात्यामध्ये तुम्ही वर्षाला 500 रुपयांपासून ते 1.5 रुपयांपर्यंत रक्कम गुंतवू शकता. पीपीएफ खात्यात भारतातील कोणताही नागरिक एक रक्कमी पैसे गुंतवू शकतो तर, मासिक गुंतवणूक देखील करू शकतो.
पीपीएफच्या व्याजदराविषयी देखील माहिती घ्या :
केंद्र सरकारकडून पीपीएफ खात्यावर 7.1% दराने व्याजदर मिळत आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडचा मॅच्युरिटी पिरियड 15 वर्षांचा असतो. म्हणजे पंधरा वर्षानंतर तुम्हाला गुंतवलेले पैसे व्याजासकट दुप्पटीने मिळतात. तुम्हाला पीपीएफ खात्यामध्ये आणखीन गुंतवणूक करायची असेल तर, 5-5 च्या एक्सटेंड पिरियडनुसार वाढवता येऊ शकते. अशाप्रकारे तुम्ही अगदी 50 वर्षापर्यंत देखील योजना सुरू ठेवू शकता. खाते उघडल्यानंतर यामध्ये 500 रुपये जमा करणे आवश्यक आहे.
पीपीएफ खात्यात मिळते लोनची देखील सुविधा :
पीपीएफ खाते आपल्या ग्राहकांसाठी लोनची सुविधा देखील प्रदान करते. यामध्ये तुम्ही गुंतवलेल्या रक्कमेच्या 25% लोन तुम्हाला प्राप्त होते. एवढाच नाही तर पीपीएफ योजना सुरू केल्यानंतर 5 वर्षांनी तुम्ही गरजेनुसार 50% रक्कम काढून देखील घेऊ शकता.
समजा एखाद्या व्यक्तीने 1 लाख रुपयांची रक्कम गुंतवली असेल तर, 25 वर्षानंतर एकूण 68,72,010 रुपये मिळतील. यामधील तुम्ही गुंतवलेली रक्कम 25,00,000 असेल आणि तुम्हाला मिळालेले व्याज 43,72,010 रुपयांचे असेल. तुम्हाला पीपीएफ खात्यासंबंधी कोणत्याही गोष्टीची माहिती हवी असेल तर, तुम्ही तुमच्याजवळील बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करावी आणि योग्य माहिती घ्यावी.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.