अभिनेत्री प्रिया बेर्डे आज सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार

पुणे, ४ जुलै : चित्रपट निर्मात्या अभिनेत्री आणि दिग्दर्शक प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे या 7 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुण्यात मार्केट यार्डातील ‘निसर्ग’ येथील पक्षाच्या कार्यालयात हा प्रवेश होणार आहे.
बेर्डे यांच्या समवेत अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके, अभिनेते विनोद खेडकर, लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर, ज्येष्ठ सिने अभिनेत्री सुहासिनी देशपांडे कार्यकारी निर्माते संतोष साखरे, लेखक दिग्दर्शक अभिनेते डॉक्टर सुधीर निकम, अखिल भारतीय चित्रपट मउहामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, हे सर्वजण राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागांमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबा पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
त्याचसोबत पुणे शहर माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. कारण याच ठिकाणी माझ्या मुलांचे शिक्षण झाले आहे. लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनचं कामही पुण्यातून सुरु झाले. त्यामुळे पुण्यातून माझ्या नव्या कारकिर्दीला सुरुवात करण्याची इच्छा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचे मार्गदर्शन मिळू शकेल, यासाठी मी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे असं प्रिया बेर्डे यांनी सांगितले.
प्रिया बेर्डे यांनी मराठीतल्या अनेक प्रसिद्ध चित्रपटात काम केले आहे. बजरंगाची कमाल, धमाल जोडी, जत्रा, तु.का पाटील, रंपाट, रंगत संगत, अशी ही बनवा बनवी यासारख्या त्यांनी भूमिका साकारली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे यांनी प्रवेश केला होता. त्यांना शिरुर लोकसभेचं तिकीट पक्षाकडून देण्यात आलं, याठिकाणी डॉ. अमोल कोल्हे भरघोस मतांनी निवडून आले आहेत, त्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होत आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त १२ जागांमध्ये ज्यात साहित्यिक, कलाकार, क्रीडा अशा क्षेत्रातील दिग्गजांना संधी देण्यात येते. या निमित्ताने प्रिया बेर्डे यांना ही संधी मिळू शकते का? अशी चर्चा सध्या सुरु आहे.
News English Summary: Filmmaker, actress and director Priya Laxmikant Berde will join the NCP on July 7. The entrance will be held at the party’s office at ‘Nisarg’ in the Market Yard in Pune in the presence of MP Supriya Sule.
News English Title: Marathi actress Priya Berde will join NCP in presence of MP Supriya Sule News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC