25 September 2020 9:02 PM
अँप डाउनलोड

पुण्यात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने ५५ गाड्यांची तोडफोड

Vehicles burned in Pune

पुणे : महाराष्ट्रातील सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात पुन्हा एकदा गुंडांचा उच्छाद पाहायला मिळाला आहे. गुंडांनी दहशत निर्माण करण्यासाठी पुण्यातील सहकारनगर भागात जवळपास ५५ गाड्यांची तोडफोड केली आहे. यात रिक्षा आणि दुचाकींचा समावेश आहे. या घटनेमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं असून पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

यापूर्वी याच ठिकाणी अशी घटना घडून ५० ते ५५ गाड्यांची सीट फाडून गाड्यांचे मोठे नुकसान करण्यात आले आहे. यामुळे स्थानिक नागरिक दहशतीखाली आहेत. याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे. यामध्ये रिक्षा आणि दुचाकींचा समावेश आहे. या घटनेमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं असून पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सहकारनगरच्या तळजाई टेकडी भागात पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. गुंडांनी ५५ ते ६० गाड्या फोडल्या. यामागे नेमकं कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस घटनास्थळी पोहचले असून तपास करत आहेत.

३ रिक्षा, कार आणि ३० ते ३५ दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. हे टोळके कोण होते, त्यांनी कशासाठी ही तोडफोड केली याची काहीही माहिती अजून सहकारनगर पोलिसांना होऊ शकली नाही. टोळक्याने लाकडी दांडके, कोयते यांच्या सहाय्याने वाहनांच्या काचा फोडल्या. पुण्याबरोबरच पिंपरीतील थरमॅक्स चौक, अजंठानगर येथेही १० ते १२ वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटनाही मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.

 

Web Title:  Vehicles burned in Pune Pimpari to terrorize local people by hooligan.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Pune(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x