30 April 2025 1:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स सेक्टर कंपनी शेअर्स खरेदी करून ठेवा, मोठा अपसाईड परतावा मिळेल - NSE: BEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
x

सावधान मुंबईकर | आज 5 दिवसाच्या गणपतीचे विसर्जन | विसर्जनाच्या पवई तलावात मगरीचे दर्शन

Ganesh Utsav

मुंबई, १४ सप्टेंबर | सोनपावलांनी घरी आलेल्या गौराईची पाच दिवस पूजाअर्चा करण्यात आली. या पाच दिवसात महिलांनी फुगडी घालून फेर धरला. घागरी फुंकल्या आणि सूपही उडवले… सासू-सूनांनी गौराई समोर गाणी म्हणत मनमोकळंही केलं. पाच दिवस चालेल्या या पारंपारिक पूजाअर्चेनंतर आज माहेरवाशीण गौराईला निरोप देण्याची वेळ आली आहे. आज दुपारनंतर या माहेरवाशीण गौराईंना जड अंतकरणाने निरोप दिला जाणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकाही सज्ज झाली आहे.

सावधान मुंबईकर, आज 5 दिवसाच्या गणपतीचे विसर्जन, विसर्जनाच्या पवई तलावात मगरीचे दर्शन – Immersing Ganesha crocodile darshan in Powai lake of Mumbai :

मुंबईमध्ये गौरी-गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. आज 5 दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केले जात आहे. मुंबईच्या पवई तलाव परिसरामध्ये भाविक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी येत आहेत. पूर्व उपनगरातील पवई घाट हा सर्वात मोठा विसर्जन घाट आहे. या ठिकाणी मगरीचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. विसर्जनादरम्यान ही मगर प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाली.

गणेश विसर्जनासाठी पवई तलाव परिसरामध्ये पालिका प्रशासनाकडून तसेच पोलीस प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे. पवई तलावामध्ये असलेला मगरींचा वावर पाहतात पवई तलावात थेट गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पाण्यामध्ये उतरण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात आलेली आहे. गणेश विसर्जनासाठी या परिसरात स्वयंसेवक नेमण्यात आलेले आहेत. ज्या ठिकाणी गणेश विसर्जन करण्यात येणार आहे, त्या गणेश घाटावर तारेचे कुंपण तयार करण्यात आलेले आहे. या कुंपणाच्या बाहेर मगरीचा वावर दिसून येतोय. त्यामुळे पाण्यात न उतरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Immersing Ganesha crocodile darshan in Powai lake of Mumbai.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BMC(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या