3 May 2025 8:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Sarkari Naukri | भारतीय टपाल खात्यात २३५७ पदांवर भरती | शिक्षण १० वी | ऑनलाईन अर्ज करा

Indian Post Recruitment 2021

मुंबई, १५ ऑगस्ट | भारतीय टपाल खात्याच्या पश्चिम बंगाल सर्कल ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज दाखल करण्याची उद्याची शेवटची तारीख आहे. यात इयत्ता १० वी उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज दाखल करू शकणार आहेत.

इयत्ता १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. एकूण २३५७ जागांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना टपाल खात्याच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज दाखल करता येणार आहे. टपाल खात्यातील या भरतीसाठीचं अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २० जुलै २०२१ रोजीच सुरू झाली होती. अर्ज दाखल करण्यासाठीचा उद्याचा शेवटचा दिवस आहे.

इयत्ता १० वी उत्तीर्ण उमेदवार देखील या नोकरीसाठी अर्ज दाखल करू शकणार आहेत. याशिवाय कमीत कमी ६० दिवसांचा कॉम्प्युटर कोर्स केलेला असणं देखील गरजेचं आहे. उमेदवाराचं वय १८ वर्षांपेक्षा अधिक तर ४० वर्षांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे. याशिवाय एससी, एसटी, ओबीसी, पीडब्ल्यूडी, पीडब्ल्यूडी ओबीसी आणि पीडब्ल्यूडी एससी प्रवर्गासाठी उमेदवारांना अनुक्रमे ५,३,१०, १३ आणि १५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

इयत्ता १० वीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना appost.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज दाखल केल्यानंतर त्याची ऑनलाइन प्रिंट आऊट काढता येणार आहे. त्याचा भविष्यात उपयोग होऊ शकतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Indian Post Recruitment 2021 for 2357 post notification released free job alert news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या