29 March 2024 6:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

महापोर्टल'मार्फत होणाऱ्या सरकारी भरतीला स्थगिती; पण महाराष्ट्रनामा'वर मोफत अभ्यास सुरु ठेवा

Chief Minister Uddhav Thackeray, Shivsena, MP Supriya Sule

मुंबई: अनेक त्रुटी असल्याने महापोर्टल विरोधात राज्यभर आंदोलन पेटली होती. कारण विद्यार्थ्यांना याविषयी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता, तसेच या ऑनलाईन प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यात अनेक निवेदनं आणि आंदोलनं करून देखील फडणवीस सरकारने याची दखल घेतली नव्हती.

दरम्यान, राज्य सरकारतर्फे विविध खात्यांच्या भरती प्रक्रिया सुरु झाल्याने उमेदवारांमध्ये नव्या सरकारकडून यासंदर्भात अनेक अपेक्षा होत्या. कारण राज्य शासनाच्या विविध विभागांच्या नोकरभरतीच्या परीक्षा महापोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापोर्टल बंद करुन नवे आणि त्रुटी नसलेले उत्तम पोर्टल सुरु करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन केली होती. तसेच मनसे, शिवसेना, काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी सेनेची देखील हीच मागणी होती.

त्यामुळे आंदोलक विद्यार्थी आणि मागणी करणाऱ्या सर्व पक्षांच्या निवेदनांचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तूर्तास या महापोर्टल मार्फत होणाऱ्या ऑनलाईन भरती प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. आदेशानुसार, सदर पोर्टलमधील सर्व त्रुटी अशी दूर करून, त्यानंतर सुसज्य आणि त्रुटी विरहित पोर्टल बनवून सदर भरती प्रक्रिया पुढे पार पाडली जाईल असे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाने प्रशासनाला दिले आहेत.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x