5 February 2023 10:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Share Price | हिंडेनबर्गमुळे अदानी ग्रुप हादरला, एलआयसी शेअर्सला सुद्धा मोठा फटका बसणार? तुमचे पैसे बुडणार? Gold ETF Investment | गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक, मिळतील अनेक फायदे आणि वेगाने संपत्ती वाढेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जबरदस्त कोसळले, रविवारी खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील आजचे नवे दर पहा My Salary Slip | पगारदार व्यक्ती आहात? तुमच्या पगाराच्या स्लिपमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असतो माहिती आहे? लक्षात ठेवा Vodafone Idea Share Price | भारत सरकार 'व्होडाफोन आयडिया' मध्ये सर्वात मोठी गुंतवणुकदार, शेअरचं पुढे काय होणार? Horoscope Today | 05 फेब्रुवारी 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Paytm Share Price | पेटीएम शेअरमध्ये पडझड, कंपनी प्रोफीटेबल होईल? गुंतवणूकदारांनी काय करावे?
x

भरधाव कारच्या धडकेने तरुणीचा जागीच मृत्यू; मुंबई चुनाभट्टी येथील घटना

Archana Parte, Mumbai Hit and Run Case

मुंबई: काल रात्री एका भरधाव कारने धडक दिल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याने चुनाभट्टी परिसरात जनक्षोभ उसळला आहे. कारमध्ये एकूण ४ तरुण होते आणि ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे. मद्यधुंद अवस्थेत असल्याने कारवरील ताबा सुटल्याने त्यांनी रस्त्यालगत चालणाऱ्या तरूणीला धडक दिली. याच तिचा मृत्यू झाला. अर्चना पारठे असे मृत तरुणीचे नाव आहे.

चुनाभट्टी येथील धावजी मार्गावरून रात्री ठीक ८.४५ वाजण्याच्या सुमारास एमएच ०५ बीजे ३९२० क्रमांकाची असलेली कार दत्त मंदिर जवळून व्ही. एन. पूरव मार्गावर जात होती. या कारमधील मद्यधुंद चालकाने बाजारात खरेदी करुन घरी चालत जाणाऱ्या दोन मुली व एका महिलेला धडक दिली. त्यामध्ये अर्चना पारठे या मुलीला चालकाने स्वदेशी मिल चाळ नंबर ११३ येथे फरफटत नेत गाडीखाली चिरडले. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला, तर बाजूने जाणाऱ्या दोन महिलाही जखमी झाल्या.

शनिवारी सकाळपासूनच मयत तरूणीच्या नातेवाईकांनी चुनाभट्टी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या केला आहे. तर, या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असल्याचेही पोलीस सांगत आहेत. याप्रकरणी गु.र.क्र. ३१५/१९ कलम ३०४(२), २७९, ३४ भा.दं.वि. सह १५४, १८५,१८८, १३४ (अ), (ब) मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र जो पर्यंत आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मुलीच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

 

Archana Parte Female Hit and Run Alcoholic Driver Young Girl Death in Chunabhatti Police Station Area

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x