15 December 2024 11:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा
x

Teachers Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 285 जागांवर शिक्षक पदासाठी भरती, अधिक माहिती येथे वाचा

Teachers Recruitment 2022

Teachers Recruitment 2022 | गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक वर्ग ज्या गोष्टीची वाट पाहत होत त्याला आता मुहूर्त लागला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये मानधन तत्वावर उपशिक्षकांची भरती होत आहे. शाळांमध्ये एकून १६७ जागा रिक्त आहेत. त्यामुळे मानधम तत्वावर एकून २८५ शिक्षकांची भरती निघाली आहे. साल २०१९ पासून ही पदे रिक्त आहेत. पवित्र या पोर्टलवर या रिक्त पदांची माहिती दिली गेली. तसेच महापालिकेने देखील भरती होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

महापालिकेच्या एकूण १०५ जागा रिक्त आहेत. त्यातील मराठी १४०, हिंदी १३, उर्दू १४ अशी रिक्त पदे भरणार आहेत. या तिन्ही ठिकाणी १६७ शिक्षकांची गरज आहे. या रिक्त जागा भरण्याकरीता सध्या मानधन तत्वावर भरती काढली आहे. एकूण २८५ शिक्षकांची ही भरती उपशिक्षक या पदावर होत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेत सध्या ३४ हजार ७३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोना महामारीत शाळा ऑनलाइन सुरु होत्या. त्यामुळे अनेक शिक्षकांनी सेवानिवृत्ती घेतली. तसेच काही शिक्षक याच काळात सेवानिवृत्त झाले त्यात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक वर्ग कमी पडत होता. मात्र कोरोना महामारीने ही भरती लांबनीवर गेली.

मात्र आता सर्व परिस्थीती उत्तम आहे. दिवाळ सण देखील उत्साहात साजरा झाला. आता सुट्या संपल्यावर तरी विद्यार्थ्यांना निट शिक्षण मिळणे अपेक्षीत आहे. यासाठी शिक्षक वर्गाची आवश्यकता आहे. कारण ऑनलाइन अभ्यासामुळे अनेक विद्यार्थि मागे पडले आहेत. त्यांचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी शिक्षक भरती गरजेची आहे.

प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले की, पवित्र पोर्टलवर असलेली रिक्त पदे आता महापालिका भरत आहे. ही पदे मानधन तत्वावर आहेत. यात विद्यार्थींचे आणखीन नुकसान होउ नये हा उद्देश आहे.

पदे या कारणाने काहेत रिक्त
* राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलवर भरती न झाल्याने रिक्त पदे २०१९ पासून तशीच आहेत.
* कोरोना काळात अनेक शिक्षक निवृत्त झाले आणि काहींनी स्वत:हून निवृत्ती घेतली.
* कोरेना मुळे ही भरती लांबणीवर राहिली आहे.
* २३ शाळांमध्ये मुख्यध्यापकच नाहीत

महापालिकेच्या एकून २३ शाळा मुख्यध्यापकांवीना सुरु आहेत. यात मराठी २१ आणि उर्दू २ अशी पदे रिक्त आहेत. कोरोनामध्ये सेवानुवृत्ती झाल्यावर ही पदे रिक्त झाली. ती आता पर्यंत रिक्तच आहेत. त्यामुळे ही पदे लवक भरावीत अशी मागणी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकवर्ग करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Teachers Recruitment 2022 Mega recruitment of teachers in Pimpri Chinchwad Municipal corporation November 2022 05 November 2022.

हॅशटॅग्स

Teachers Recruitment 2022(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x