मुंबई ६ ऑगस्ट : भारतात प्रत्येक भागात चिकन करण्याची पद्धत वेग वेगळी आहे. आज आम्ही तुमच्यासाठी खास वेगळ्या पद्धतीची चिकन ग्रेव्ही पाककृती आणि त्याचे साहित्य सांगणार आहे .
साहित्य :
* चिकन मॅरीनेशन साठी साहित्य
* 1/2 किलो चिकन
* 1 वाटी दही
* 1 टीस्पून हळद
* 1 टीस्पून लाल तिखट
* 1 टीस्पून गरम मसाला
* 1 टीस्पून आले लसून पेस्ट
* 1 टीस्पून कसुरी मेथी आणि मीठ
* चिकन ग्रेव्हीसाठी साहित्य
* 2 बारीक कापलेला कांदा
* 2 टोमॅटो पेस्ट
* 3-4 हिरवी मिरच्या
* कोथंबीर
* काजू
* सुके खोबरे यांचे वाटण
* 1 टीस्पून हळद
* 1 टीस्पून लाल तिखट
* 1 टीस्पून गरम मसाला
* 1 टीस्पून धना जिरा पावडर
* 1 टीस्पून आले-लसूण पेस्ट
* 1 वेलची
* 1 लवंग
* 1 दालचिनी
* 3-5 मिरी
* चवीनुसार मीठ,फोडणीसाठी तेल
कृती :
१. प्रथम चिकन धुवून घ्यावे त्यानंतर हळद,लाल तिखट,गरम मसाला,आले लसून पेस्ट, कसुरी मेथी आणि मीठ चिकन ला चोळून घ्यावे नंतर दही ॲड करावे आणि मिक्स करून दोन तासासाठी एका साईडला ठेवून द्यावे दोन तासानंतर एका पॅनमध्ये थोडे तेल घालून मॅरीनेटेड चिकन व्यवस्थित शिजवून ड्राय होईपर्यंत ठेवावे
२. एका पातेल्यात वेलची,लवंग,मिरी, दालचिनी परतून घ्यावे.नंतर आले लसूण पेस्ट घालावे ती परतल्यावर बारीक चिरलेला कांदा घालावा. तो गोल्डन ब्राऊन परतावा नंतर टोमॅटो पेस्ट घालावी व्यवस्थित परतून घ्यावे.नंतर हळद, लाल तिखट, गरम मसाला, धना जिरा पावडर आणि मीठ घालून घ्यावे आणि तेल सुटेपर्यंत परतावे.
३.नंतर हिरवी मिरच्या, कोथंबीर,काजू,सुके खोबरे यांचे वाटण घालावे आणि ते तेल सुटेपर्यंत परतावे.नंतर शिजलेले चिकन त्यामध्ये घालावे आणि ४. आवश्यकतेनुसार पाणी घालून थोडावेळ स्लो गॅस वर ठेवून द्यावे. तयार चिकन ग्रेव्ही तांदळाच्या भाकरी बरोबर सर्व्ह करावे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Chicken masala recipe in Marathi news updates.
