मुंबई, २१ जुलै | अनेकांना फ्लॉवर आणि गोबीचे भाजी जेवणामध्ये खाण्यास पसंत नसते. परंतु हे दोन्ही घटक पोषकतत्वांसाठी महत्वाचे आहेत. म्हणून याचे पराठे बनवून तुम्ही हे कुटुंबियांना खायला देऊ शकता. यामुळे गोबी, फ्लॉवरमधील पोषक तत्वे शरीरात जाण्यात मदत होईल. मी बोलत आहे ते गोबी धपाटे किंवा पराठे याविषयी. ही एक सोपी आणि पोषकतत्वाची रेसिपी आहे. जी तुम्ही तुमच्या फावल्या वेळात कधीही बनवू शकता. शिवाय ही घरीच उपलब्ध असलेल्या घटकांपासून तयार होते.

संपूर्ण साहित्य:
* गोबी किसून घेतलेला २ कप
* लाल तिखट चवीनुसार
* मीठ चवीनुसार
* हिंग, जिरे, धने पावडर आवश्यकतेनुसार
* तेल आवश्यकतेनुसार
* बारीक चिरलेला कांदा २
* बारीक चिरलेली कोथिंबीर आवश्यकतेनुसार
* चिरलेली हिरवी मिरची २
* आलं – लसून पेस्ट आवश्यकतेनुसार
* गहू, मका, ज्वारी, नाचणी, तांदूळ, बेसण पीठ प्रत्येकी १/२ वाटी

संपूर्ण कृती:
* सुरुवातील गोबी स्वच्छ धूवून किसनीनच्या मदतीने बारीक किसुन घ्या.
* त्यानंतर गव्हाच्या पीठासह मका, ज्वारी, नाचणी, तांदूळ, बेसण ही पीठे एकत्र करुन त्याची सैलसर कणिक मळून घ्यावी.
* हे मळत असताना ते पीठ अधिक ओलं आणि पातळ होईल अशा पद्धतीने मळावे.
* आता किसलेला गोबी या मिश्रणात घाला. त्यानंतर या पिठात लाल तिखट, मीठ, आलं लसून पेस्ट, चिरलेला कांदा, मिरची घाला.
* या तयार मिश्रणात वरून हिंग, जिरे, धने पावडर घाला. तुमचे पराठ्याचे किंवा धपाट्याचे पीठ मळून तयार आहे.
* आता पोळपाट घेऊन त्यावर एक सुती कापड टाका. छोटा गोळा यावर ठेवून त्याला हाताने हळूवार गोलाकार पोळीसारखा आकार द्या.
* यानंतर अलगत हाताने थापटलेल्या पोळीला हळुवार लाटण्याच्या सहाय्याने लाटून घ्या.
* पॅन गरम झाल्यानंतर त्यात हा तयार पराठा किंवा धपाटा भाजून घ्या.
* भाजताना त्यावर तेल सोडा. मोठ्या गॅसवर दोन्ही बाजूंनी याला भाजून घ्या.
* तयार गरमा गरम पराठा तुम्ही दही किंवा सॉस सोबत खाऊ शकता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Gobi Dhapate recipe in Marathi news updates.

Special Recipe | घरच्याघरी बनवा चटपटीत गोबी धपाटे – वाचा रेसिपी