शेतकरी आपल्या देशाची लाईफलाइन | आंदोलनामुळे वाढदिवस साजरा करणार नाही - युवराज सिंह

नवी दिल्ली, १२ डिसेंबर: केंद्र सरकारच्या तीन तृषी कायद्याविरोधात (New Agriculture Laws) आंदोलन करणारे शेतकरी (Kisan Andolan) आता आपला लढा आणखी तीव्र करण्याच्या तयारीत आहेत. भारत बंदनंतर आता शेतकरी आंदोलन आणखी पेटणार असल्याचं दिसत आह. कारण मिळालेल्या माहितीनुसार, बलबीर, भारतीय किसान युनियनचे (Bharatiya Kisan Union) अध्यक्ष बलबीर. एस. राजेवाल (Balbir S Rajewal) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 डिसेंबर रोजी दिल्ली-जयपूर रस्ता रोखण्यात येणार आहे. इतकंच नाही तर उपजिल्हाधिकारी कार्यालये, भाजपा नेत्यांच्या घरांसमोर निदर्शनंदेखील करण्यात येणार आहे. यावेळी टोल प्लाझादेखील रोखण्यात येईल. यामध्ये केएमएससी नेत्यांच्या अंदाजाप्रमाणे सुमारे 30,000 शेतकरी ट्रॅक-ट्रॉलीसह दाखल होणार आहेत.
दुसरीकडे, कृषी कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी पंजाबच्या सात जिल्ह्यांमध्ये सुमारे एक हजार गावातून 1,500 हून अधिक वाहनं येणार आहेत. त्यापैकी 1,300 ट्रॅक्टर-ट्रॉली दिल्लीकडे येणार आहे. किसान मजदूर संघर्ष समितीने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब आंदोलकांनी त्यांचा एक नवीन काफिला तयार केला आहे. जो रविवारी दिल्लीच्या सीमेपर्यंत दाखल होणार आहे.
दरम्यान, भारतीय क्रिकेट टीमचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह (Indian all-rounder Yuvraj Singh) याचा आज ३९ वा वाढदिवस आहे. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याचं युवराजनं ट्विट करत सांगितलं आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या लवकर पूर्ण व्हाव्यात अशी माझी तीव्र इच्छा देखील त्यानं समाज माध्यमांवरून व्यक्त केली आहे. शिवाय वडील योगराज सिंह यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याचं समाज माध्यमांवरून प्रसिद्धीपत्रकाद्वारे युवराजनं स्पष्ट केलं (Yuvraj clarified in a press release on social media that he would not celebrate his birthday) आहे. यामध्ये युवराज सिंह म्हणतोय की, ‘शेतकरी हे आपल्या देशाची लाईफलाइन आहेत. अशी कोणतीही समस्या नसते की ज्यातून मार्ग निघत नाही. चर्चेच्या माध्यमातून प्रत्येक मुद्दा सोडवता येऊ शकतो. आजचा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्यात सुरु असलेल्या चर्चेतून मार्ग निघावा अशी माझी इच्छा आहे.’
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) December 11, 2020
वडिलांनी केलेले वक्तव्यही निराशजनक असल्याची प्रतिक्रिया युवराजनं यावेळी दिली आहे. भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. योगराज सिंह यांच्या वक्तव्याशी माझा कोणताही संबंध नाही. त्यांचं ते व्यक्तिगत मत होते. त्याच्याशी मी देखील अजिबात सहमत नाही.
News English Summary: Former Indian all-rounder Yuvraj Singh turns 39 today. Yuvraj has tweeted that he will not celebrate his birthday in support of the farmers’ movement. He has also expressed his strong desire that all the demands of the farmers be met soon through social media. Besides, the statement of father Yograj Singh has been reported.
News English Title: Cricketer Yuvraj Singh support farmers protest in birthday post News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN