14 February 2025 2:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: YESBANK GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, स्टॉक मध्ये मोठी घसरण होऊ शकते - NSE: GTLINFRA NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमधील घसरण थांबेना, 6 महिन्यात 32% घसरला, पुढे काय होणार - NSE: SUZLON RVNL Share Price | मल्टिबॅगर रेल्वे कंपनी शेअर 6 महिन्यात 33% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: RVNL EPFO Passbook | खाजगी पगारदारांसाठी खुशखबर, EPF व्याजदर वाढणार, 7 कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, दुप्पट होतील पैसे, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS
x

फ्रान्स फिफा वर्ल्डकप २०१८चा विश्वविजेता

रशिया : फिफा वर्ल्डकप २०१८ च्या अंतिम सामन्यात पूर्वार्धातच फ्रान्स आणि क्रोएशियाकडून तुंबळ अॅक्शन पाहायला मिळाली. सामान्यांच्या १८व्या मिनिटाला फ्रान्सच्या टीमला मिळालेल्या फ्री-किकचा बचाव करताना क्रोएशियाच्या मॅन्झुकिचने आत्मघातकी ओन गोल केला आणि फ्रान्सला एका गोलाने आघाडी मिळाली.

परंतु आक्रमक क्रोएशियाच्या पेरिसिचने निव्वळ २८व्या मिनिटाला गोल डागत संघाला बरोबरीत आणलं. मग ३८व्या मिनिटाला फ्रान्सला पेनल्टी किकची संधी मिळताच ग्रीझमनने थेट गोल केला आणि फ्रान्स’ला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. अखेर मध्यंतरापर्यंत फ्रान्सने २-१ अशी आघाडी कायम राखली होती. परंतु पुन्हा सामना सुरु होताच फ्रान्स’च्या अनुभवी पोगबाने गोल डागत फ्रान्सला ३-१ भक्कम आघाडीत ठेवले.

त्यानंतर लगेचच ६५व्या मिनिटाला एमबापेने गोल डागत फ्रान्सला ४-२ या भक्कम आघाडीवर ठेवले. त्यानंतर लगेचच क्रोएशियाच्या मॅन्झुकिच याने ६९व्या मिनिटाला गोल डागत क्रोएशियाला थोडा दिलासा दिला. त्यानंतर मात्र फ्रान्सने सामना संपेपर्यंत क्रोएशियाला डोक वर करण्याची संधी दिली नाही. शेवटी रेफरीची शिट्टी वाजली आणि फ्रान्स ठरला फिफा फुटबॉल २०१८चा विश्वविजेता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x