18 November 2019 12:23 AM
अँप डाउनलोड

बाळासाहेबांचं स्मारक एका क्षणात का नाही होऊ शकत: निलेश राणे

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पुण्याच्या दौऱ्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत मोदी सरकारला चिमटा काढताना राम मंदिर एका क्षणात का नाही होऊ शकत असं भाष्य केलं होत. शिवसेना सध्या केंद्रात, राज्यात आणि मुंबई महापालिकेत सत्तेत आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या राम मंदिरा विषयीच्या भाष्याला विरोधकांनी लक्ष केलं आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि रत्नागिरीचे माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना बोचरा प्रश्न केला आहे. राम मंदिर एका क्षणात का नाही होऊ शकत या उद्धव ठाकरेंच्या विधानाचा संदर्भ घेत निलेश राणे यांनी केंद्रात, राज्यात आणि मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेला आणि अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांना प्रश्न केला आहे की,’बाळासाहेबांचं स्मारक एका क्षणात का नाही होऊ शकत?’.

स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा भावनिक मुद्दा त्यावेळी शिवसेनेने उचलून धरला होता. परंतु सत्तेत येऊन इतकी वर्ष स्वर्गीय. बाळासाहेबांच्या त्या स्मारकाची साधी वीट सुद्धा रचली न गेल्याने निलेश राणें’ना आयतीच संधी मिळाली असून त्यांनी अचूक वेळ साधत उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका करणारा प्रश्न उपस्थित केला आहे.

नेमकं काय आहे माजी खासदार निलेश राणे यांचं ते ट्विट;

हॅशटॅग्स

#Shivsena(741)#udhav Thakarey(398)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या