मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यातील वादाच्याच चर्चा गेल्या आठवडाभर रंगल्या. पण, कॅप्टन कोहलीनं या सर्व वृत्ताचं खंडन करताना संघात ऑल इज वेल असल्याचे सांगितले. वेस्ट इंडिज दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकारपरिषदेत कोहलीनं या अफवा असल्याचे स्पष्ट केले. या सर्व वादावर रोहितनं आतापर्यंत कोणतही विधान केलं नव्हतं, परंतु बुधवारी त्यानं समाज माध्यमांवर एक पोस्ट टाकून स्वतःचं मत व्यक्त केलं.

विराट कोहलीने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर रोहित शर्माने ट्विट करत म्हटलेय की, ‘‘मी फक्त संघासाठी खेळत नाही, तर मी आपल्या देशासाठी खेळतोय.’’ यासोबतच रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेत फलंदाजी करायला जातानाचा फोटो पोस्ट केला आहे.

रोहितने आता ट्विटरच्या माध्यमातून एक चांगला संदेश देत सारंकाही आलबेल असल्याचं दाखवून दिलं आहे. रोहितच्या या ट्विटवर चाहते देखील मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देत आहेत. रोहितने अचूक वक्तव्य केलं असून सर्वांना त्याचा अभिमान असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय ट्विट केले आहे रोहितने?

मी फक्त संघासाठी नाही तर देशासाठी देखील खेळतो : रोहित शर्मा