12 December 2024 2:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL
x

World Cup Final | अदाणींची मोठी गुंतवणूक असलेल्या ऑस्ट्रेलियाचे मंत्री लावणार हजेरी, स्क्रिप्टेड मोदी-मोदी घोषणा देणारे देखील हजर असणार

ICC Cricket World 2024

World Cup Final | आज रविवारी (१९ नोव्हेंबर) होणाऱ्या ब्लॉकबस्टर सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ सज्ज झाले आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये राजकारणापासून बॉलिवूडपर्यंतच्या सेलिब्रिटींसह सुमारे एक लाख ३० हजार प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत. दोन्ही संघातील २२ खेळाडूंची त्यांची चाचणी घेण्यात येणार आहे. सव्वा लाखांहून अधिक प्रेक्षक भारतीय संघाला पाठिंबा देतील आणि हेच कांगारूंसाठी सर्वात मोठे आव्हान आहे सामन्यातील विविध घटनांबरोबरच प्लेईंग-११ कडेही चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही येणार आहेत. त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्सही असतील. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सुरक्षा, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली.

केवळ याच स्टेडियमवर क्रिकेट मॅच दरम्यान श्रीराम नावाच्या घोषणा, DJ गाण्यावर देखील तेच आणि गर्दीत अचानक येणाऱ्या मोदी-मोदी घोषणा पाहायला मिळाल्या होत्या. त्यामुळे महत्वाच्या मॅचेस गुजरातमध्ये याच स्टेडियमवर का आयोजित करण्यात आल्या याची देखील चर्चा सुरु झाली होती. सध्याच्या ५ राज्यांच्या निवडणुकांपैकी मध्य प्रदेश, मिझोराम आणि छत्तीसगडमध्ये मतदान पूर्ण झालं आहे. तर तेलंगणात भाजप स्पर्धेत नाही, पण राजस्थानमध्ये मतदान झालेलं नसून तिथे भाजपाला थोडी आशा आहे. त्यामुळे स्टेडियमवर स्क्रिप्टेड राजकीय घटना घडवल्या जातील आणि त्याला गोदी मीडिया उचलून धरेल आणि समाज माध्यमांवर तेच व्हायरल केलं जाईल असं म्हटलं जातंय.

अदाणींची ऑस्ट्रेलियामध्ये प्रचंड गुंतवणूक
ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त बॅरी ओ फॅरेल यांनी मार्चमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अदानी समूह ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे गुंतवणूकदार आहेत. हिंडेनबर्गच्या अहवालाचा अदानी समूहावर होणारा परिणाम हा भारताच्या नियामकांचा विषय असून या उद्योग समूहाने ऑस्ट्रेलियातील कामकाज बंद केल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही, असे ओ’फॅरेल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.

‘अदानी यांची ऑस्ट्रेलियातील गुंतवणूक पूर्णपणे कार्यरत आहे आणि स्वच्छ ऊर्जा असो वा कोळसा, संसाधने पूर्णपणे पुरवत आहे. अदानी समूह आजही ऑस्ट्रेलियातील भारताचे महत्त्वाचे गुंतवणूकदार आहेत,’ असे अदानी समूहाविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राजदूतांनी सांगितले होते. अदानी समूह ऑस्ट्रेलियात पोर्ट टर्मिनल, कोळसा खाणी आणि सौर ऊर्जा प्रकल्प चालवतो.

News Title : ICC Cricket World 2023 check details on 19 November 2023.

हॅशटॅग्स

#ICC World Cup(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x